An appeal to avail the schemes of Mahatma Phule Backward Classes Development Corporation
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महार, नवबौद्ध, बुरूड, वाल्मिकी, मेहतर, खाटीक या समाजातील वंचित घटकातील नागरिकांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसएफडीसी) यांच्या विविध कर्ज योजना ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या सर्व योजना व राज्य शासनाच्या अनुदान बीज भांडवल प्रशिक्षणासाठी अर्जदारांनी एनबीआर पोर्टलवरून अर्ज करावेत. तसेच राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसकेएफडीसी) यांच्या योजनेसाठी https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज करता येतील.
एनएसकेएफडीसी यांच्या अंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी अर्जदारांनी नवयुग बेनीफिशरी रजिस्ट्रेशन (एनबीआर) पोर्टल https://nbrmahapreit.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं.१०३/१०४, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे – ४११०१५, दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०३०५८ वर संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. एम. माने यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com