The third phase of mandatory hallmarking comes into immediate effect
अनिवार्य हॉलमार्किंगचा तिसरा टप्पा तत्काळ लागू
केंद्र सरकारने अनिवार्य प्रमाणीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली; 8 सप्टेंबर 2023 पासून लागू
अनिवार्य प्रमाणीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत आणखी 55 जिल्ह्यांचा समावेश
नवी दिल्ली : सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रमाणीकरण (तृतीय सुधारणा) आदेश, 2022 नुसार अनिवार्य असलेल्या प्रमाणीकरणाचा तिसरा टप्पा 8 सप्टेंबर 2023 पासून अमलात येईल.
अनिवार्य प्रमाणीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अनिवार्य हॉलमार्किंग प्रणाली अंतर्गत आणखी 55 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर हॉलमार्किंग केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे . यामुळे अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची एकूण संख्या 343 झाली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या 55 जिल्ह्यांची यादी राज्यांनुसार भारतीय मानक ब्युरो, BIS च्या www.bis.gov.in या संकेतस्थळावर हॉलमार्किंग विभागानंतर्गत उपलब्ध आहे.
केंद्र सरकारने हा आदेश 8 सप्टेंबर 2023 रोजी जारी केला.
BIS ने 23 जून 2021 पासून देशाच्या 256 जिल्ह्यांत आणि दुसऱ्या टप्प्यात 4 एप्रिल 2022 पासून अतिरिक्त 32 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य प्रमाणीकरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे, ज्यात HUID सोबत रोज 4 लाखाहून जास्त सोन्याच्या वस्तूंचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.
अनिवार्य हॉलमार्किंगची अंमलबजावणी झाल्यापासून नोंदणीकृत दागिने विक्रत्यांच्या संख्येत 34,647 वरून 1, 81,590 इतकी वाढ झाली आहे, तर असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 945 वरून 1471 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 26 कोटींहून अधिक सोन्याचे दागिने HUID सह हॉलमार्क केले गेले आहेत.
ग्राहकांनी बीआयएस केयर ॲपवरून ‘व्हेरिफाय एचयूआयडी’ वापरून खरेदी केलेल्या हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता आणि शुद्धता पडताळून पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
बीआयएस केअर ॲपच्या डाउनलोड केलेल्यांची संख्या 2021-22 मध्ये 2.3 लाखांवरून चालू आर्थिक वर्षात 12.4 लाख इतकी झाली आहे. याशिवाय, गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत बीआयएस केअर ॲपमध्ये ‘व्हेरिफाय एचयूआयडी’वर एक कोटीहून अधिक हिट्सची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यानंतर असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रा /ओ एस सी असणा-या 55 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना, नंदुरबार, परभणी आणि यवतमाळ चा समावेश आहे. चंद्रपूरमध्ये दोन तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हॉलमार्किंग केंद्र आहे. तर या जिल्ह्यातील नोंदणीकृत ज्वेलर्स केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : चंद्रपूर 122, जालना 65, नंदुरबार 83, परभणी 94, यवतमाळ 190.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com