Manish Sisodia’s judicial custody extended till May 30
मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३० मे पर्यंत वाढ
अबकारी धोरण घोटाळा प्रकरण: दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३० मे पर्यंत वाढ
नवी दिल्ली : अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत वाढ केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सिसोदिया यांचे नाव आरोपी म्हणून नोंदवले.
विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ केली. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर सिसोदिया व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर झाले. आम आदमी पक्षाच्या नेत्याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने काल निर्णय राखून ठेवला होता.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
अधिकारी असल्याचे भासवून केले जाणारे ब्लॅकमेल आणि डिजिटल अॅरेस्टच्या घटनांविरोधात सावधगिरीचा इशारा