Manoj Jarange Patil’s second hunger strike is over
मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर सरकारला वेळ वाढवून देण्याची तयारी
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली ; त्यानंतर मुंबई बंद करण्याचा इशारा
आंतरवाली सराटी : मी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार असेल, तर सरकारला वेळ वाढवून देण्याची तयारी मनोज जरांगे यांनी दाखवली आहे. सरकारतर्फे आंतरवाली सराटी इथं उपोषणस्थळी जरांगे यांच्याशी चर्चा करायला गेलेल्या शिष्टमंडळानं मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याचं आश्वासन त्यांना दिलं. हे अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, असं मनोज जरांगेंनी यावेळी म्हटलं. तसेच आता पुढच्या लढाईसाठी तयार राहण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. तर जरांगे पाटलांनी २ जानेवारीची डेडलाईन सरकारला दिलीये.
८ डिसेंबरला मराठा आऱक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, असं शिष्टमंडळानं जरांगे यांना सांगितलं. त्यावर २४ डिसेंबरर्यंत आपण वेळ देत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. उपोषण सोडावं, अशी विनंती शिष्टमंडळानं त्यांना केली. उपोषण मागं घेऊ, पण साखळी उपोषण सुरु राहील, असं जरांगे यांनी सांगितलं.
सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली. पण जरांगे पाटील २४ डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. त्यानंतर तारखेबाबत बराच वेळ चर्चा देखील करण्यात आली. अखेर त्यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचं म्हटलं आहे. तसंच २ जानेवारीनंतर मुंबईचं नाक बंद करु असा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारतर्फे वेळकाढूपणा नसून तो प्रक्रियेचा भाग असल्याचं जरांगे पाटील यांना आज समाजावून सांगण्याचा प्रयत्न या शिष्टमंडळात सामील असलेले न्यायमुर्ती सचदेव आणि न्यायमुर्ती एम जी गायकवाड या दोन माजी न्यायाधिशांनी केला. या शिष्टमंडळात उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे. संदिपान भुमरे, नारायण कुचे यांचा समावेश होता.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं उपोषण मागे”