मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरास भेट.

Marathi Language Minister Subhash Desai visited Bhandarkar Oriental Studies Research  Institute

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरास भेट

भाषेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी भांडारकर संस्था महत्वाचे केंद्र-मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

पुणे :भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर विद्येच, ज्ञानाचे मंदिर असून प्राचीन साहित्य व भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी महत्वाचे केंद्र असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.Marathi Language Minister Subhash Desai visited Bhandarkar Oriental Studies Research  Institute

श्री. देसाई यांनी भांडारकर प्राच्य-विद्या संशोधन मंदीरास भेट देवून येथील दूमिळ ग्रंथाची, कामकाजाची माहिती घेतली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष भूपाल पटवर्धन, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यक हरी नरके, संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, प्राचीन काळातील अतिशय दुर्मिळ ग्रंथ या केंद्रात असल्यामुळे प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक या संस्थेत येतात. आधुनिक काळातही अभिमान वाटेल असा ठेवा या ठिकाणी जतन केलेला आहे.

संस्थेतील डिजीटल उपक्रम बदल घडविणारे आहेत. संस्थेच्या कार्याची दखल घेवून विविध उद्योजक या संस्थेच्या उन्नतीसाठी मदत करतात.

मराठी माणसांनीदेखील संस्थेला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. संस्थेच्या कार्याची दखल घेत उद्योग जगतातील लोकांकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *