मराठवाडा मुक्तिसंग्राम’ या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रक्षेपण

Marathwada Mukti Sangram' will be broadcast on 1st October 2023 मराठवाडा मुक्तिसंग्राम’ या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रक्षेपण हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Information drama ‘Marathwada Mukti Sangram’ will be broadcast on 1st October 2023

‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपणMarathwada Mukti Sangram' will be broadcast on 1st October 2023
मराठवाडा मुक्तिसंग्राम’ या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रक्षेपण
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्मित मुक्तिसंग्राम (कथा मराठवाडयाच्या संघर्षाची) या माहिती नाट्यपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या नाट्यमाहितीपटाचे प्रसारण सह्याद्री वाहिनीवर दिनांक १ ऑक्टोबर, २०२३ रोजी, दुपारी १.३० वाजता करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रेरणेने या नाट्य माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

पहिल्यांदाच मराठवाडा मुक्तिसंग्रामाची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असुन या नाट्य माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी केले आहे. तसेच या नाट्य माहितीपटात सुप्रसिध्द अभिनेते अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, अभिनेत्री स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांनी भुमिका साकारली आहे. त्याचबरोबर केदार दिवेकर यांनी संगीत दिग्दर्शन, निखिल लांजेकर यांनी ध्वनी संयोजन आणि प्रतीक रेडीज यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामावरती उपलब्ध पुस्तके आणि संदर्भग्रंथ यांचा सखोल अभ्यास करून ७५ मिनिटांचा हा नाट्य माहितीपट अवघ्या १२ दिवसात तयार करण्यात आला आहे.

तरी या नाट्य माहितीपटाचा आस्वाद राज्यातील प्रक्षेकांनी घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
गणपती विसर्जनावेळी पुणेकरांच्या मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसाद
Spread the love

One Comment on “मराठवाडा मुक्तिसंग्राम’ या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रक्षेपण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *