May there be heavy rains in the state and may farmers be happy and satisfied
राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊदे’
– अजित पवार यांचे गणपतीकडे मागणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडूदे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊदे असे मागणे श्रीगणेशाकडे मागितल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.
गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, तुळशीबाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक वाडा गणेशोत्सव मंडळ, सदाशिव पेठ येथील राजाराम मित्र मंडळ, साने गुरूजी तरुण मंडळ येथे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
एक तारीख एक घंटा एक साथ (एक तारखेला एक तास एकमेकांसोबत)
One Comment on “राज्यात जोमदार पाऊस पडूदे आणि बळीराजा सुखी, समाधानी होऊदे’”