मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते ११ सप्टेंबर रोजी प्रकाशन

State Election Commissioner. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

Release of voter awareness book ‘Me Superhero Bharatacha Nagarik’ by the Governor on 11th September

मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ या मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते ११ सप्टेंबर रोजी प्रकाशन

मुंबई : मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून ‘आगम’ या सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व याची माहिती देण्यासाठी ‘मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दि.11 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे.State Election Commissioner. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करत असते. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खाजगी व शासकीय आस्थापने यांचे सहकार्य घेतले जाते. मतदार जागृतीचे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून त्यांतील भाषा तरुण पिढीला सहज समजणारी आहे. हे एक ‘कॉमिक बुक’ असून साध्या सोप्या उदाहरणांतून निवडणूक यंत्रणा, मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया, सुजाण नागरिकाच्या जबाबदाऱ्या इ. समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालक यांनी हे आवर्जून वाचावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी, आगम संस्थेच्या सहसंचालक भारती दासगुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
हवाईदल उपप्रमुखांनी हिंदुस्तान टर्बो ट्रेनर एचटीटी-40 विमान चालवले
Spread the love

One Comment on “मी सुपरहिरो भारताचा नागरिक’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते ११ सप्टेंबर रोजी प्रकाशन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *