विधिमंडळ सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत

Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Members of the Legislature should raise issues using parliamentary arms

विधिमंडळ सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Legislative Council Deputy Speaker Dr. Neelam Gorhe विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News
File Photo

नागपूर : विविध आयुधांचा वापर करत विधिमंडळ सदस्यांनी विधिमंडळात सामाजिक, सार्वजनिक हिताचे प्रश्न मांडावेत. प्रश्न मांडताना विशेष काळजी घ्यावी. योग्य वेळी योग्य विषय मांडल्यास त्या विषयाला उचित न्याय मिळवून देता येतो. यासाठी विधिमंडळ सदस्यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करून विधानमंडळात प्रश्न मांडावेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘विविध संसदीय आयुधे‘ या विषयावर विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन करताना केले.

विधानभवन येथे सदस्यांना ‘विविध संसदीय आयुधे‘ या विषयावरील मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. याप्रसंगी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासमवेत विधिमंडळाचे सचिव (२) विलास आठवले, सचिव ऋतुराज कुडतरकर उपस्थित होते. यावेळी विधिमंडळ सदस्य डॉ. मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर अडबाले, आणि किरण सरनाईक उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, विविध आयुधांचा वापर करून विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नांमुळे सदस्यांची राज्यभर प्रतिमा निर्माण होत असते. विधिमंडळात मांडलेल्या प्रश्नांमुळे होणारा परिणाम यासह या प्रश्नांची व्याप्ती याबाबतचा सखोल अभ्यास विधिमंडळ सदस्यास असावा. याबरोबरच महत्वाच्या घडामोडी, घटनांकडे सभागृहाचे लक्ष त्याला वेधता यावे.

विधिमंडळ सचिव श्री. आठवले व श्री. कुडतरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, विशेष उल्लेख, ठराव, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव, पुरवणी मागण्यांवरील चर्चा, अल्पकालीन चर्चा, विधानपरिषद सदस्य विशेष अधिकार, शासकीय विधेयक व अशासकीय विधेयक, राज्यपाल अभिभाषण, अर्थसंकल्पावर चर्चा या विषयांवर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

तारांकित प्रश्नात कोणत्या स्वरूपाचे प्रश्न मांडावेत. तसेच ठरावामध्ये कोणत्या धोरणात्मक बाबी मांडल्या जाव्यात, प्रश्नांच्या उत्तरासाठी पाठपुरावा कशा पद्धतीने करावा याबाबतही श्री. आठवले व श्री. कुडतरकर यांनी सदस्यांना माहिती दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा
Spread the love

One Comment on “विधिमंडळ सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करीत विषय मांडावेत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *