लोकसहभागातून ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम उत्साहात राबविणार

'Meri Mati Mera Desh' activity will be implemented from August 9 to August 14 ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येणार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

‘Meri Mati Mera Desh’ activity will be implemented enthusiastically through people’s participation

लोकसहभागातून ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम उत्साहात राबविणार

-अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे

‘मातीला नमन वीरांना वंदन’ उपक्रम राबविण्याबाबत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठकीचे आयोजन'Meri Mati Mera Desh' activity will be implemented from August 9 to August 14 ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येणार हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम ९ ते १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविले जाणार आहे.

‘मातीला नमन वीरांना वंदन’ उपक्रम राबविण्याबाबत महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, उपक्रमाचे महानगरपालिका समन्वयक तथा उपआयुक्त मिनीनाथ दंडवते आदी उपस्थित होते.

प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरिता ‘मातीला नमन वीरांना वंदन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील संस्मरणीय अशा एका ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करणे, महानगरपालिका हद्दीतील प्रभागनिहाय एक किंवा दोन मूठ माती घेऊन त्यातून शहराचा कलश तयार करून तो सन्मानपूर्वक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन श्री. खोराटे यांनी केले.

महापालिका कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी बलिदान केले अशा सरंक्षण दल, निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी किंवा माजी सैनिकांचा सन्मान महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. महापालिकेच्यावतीने शहरातील एका ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अभियानात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in/ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर शपथ घेतांना मातीचा दिवा किंवा माती हाती धरून काढलेले सेल्फी अपलोड करता येतील.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात पंचप्रण शपथ घेतली जाणार
Spread the love

One Comment on “लोकसहभागातून ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम उत्साहात राबविणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *