Mirabai Chanu qualifies for CWG 2022 after winning gold in Singapore
सिंगापूर आंतरराष्ट्रीय भारोत्तालन स्पर्धेत मीराबाई चानू हीची सुवर्णपदकाची कमाई
सिंगापूर आंतरराष्ट्रीय भारोत्तालन स्पर्धेत, महिलांच्या ५५ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानू हीनं आज सुवर्णपदकाची कमाई केली.
मीराबाई हीनं एकूण १९१ किलो वजन उचलत सुवर्णपदक निश्चित केलं. याबरोबरच ती २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे.
मीराबाई हीनं पहिल्यांदाच ५५ किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. टोक्यो इथं झालेल्या २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तीनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं होतं.