More than 170 crore vaccines in the country so far.
देश लसीकरण मोहिमेत आजवर १७० कोटीहून जास्त लसीच्या मात्रा .
नवी दिल्ली : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत लाभार्थ्यांना सुमारे १७० कोटी मात्रा मिळाल्या आहेत. त्यात ७३ कोटी २७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी ४४ लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ५ कोटी ६५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लशींची पहिली मात्रा मिळाली आहे.
राज्यात आज सकाळपासून १ लाख २७ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५ कोटी १ लाख ३८ हजाराच्या वर गेली आहे. त्यात ६ कोटी २४ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे, तर ११ लाख १० हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ३६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लशींची पहिली मात्रा मिळाली आहे.