MP Sambhaji Raje Bhosale’s indefinite fast for reservation of Maratha community
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांचं बेमुदत उपोषण
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी खासदार संभाजीराजे भोसले आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आज हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. एकटेच उपोषणाला बसत असलो तरी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी न्यायमूर्ती भोसले समितीनं केलेल्या शिफारशींची तात्काळ अंमलबजाणी करून, लवकरात लवकर आरक्षण प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सरकारनं दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची आझाद मैदानात गर्दी झाली आहे.