महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जानेवारीत होणाऱ्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांचं सुधारित तारखांचं वेळापत्रक आज आयोगाच्या संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आलं.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीकरता जाहिराती प्रसिद्ध झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीनें, या दोन जानेवारीला नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली होती.
ही परीक्षा आता येत्या २३ जानेवारीला होणार आहे. तर २२ जानेवारीला नियोजित, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक एक, ही परीक्षा आता येत्या २९ जानेवारीला घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० पेपर क्रमांक दोन पोलीस उपनिरीक्षक, ही २९ जानेवारीला नियोजित असलेली परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता, येत्या ३० जानेवारीला घेण्यात येईल, असं आयोगानं प्रासिद्धिपत्रकाच्या माध्यमातून कळवलं आहे.