Blocks for installation of grants on Mumbai-Pune expressway
७ डिसेंबर रोजी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक
मुंबई : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव हद्दीत कि.मी ७४/९०० व खंडाळा हद्दीत कि.मी ५६/९०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दि ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.
या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार ) किवळे पुलावरून जुना मुंबई -पुणे महामार्गावरून मुंबई दिशेला वळविण्यात येणार आहे. पुणे ते मुंबई जुना महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोल नाका येथून एक्सप्रेस वेवर मुंबई दिशेने सोडण्यात येतील.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
जातीविरहित समाजाची निर्मिती करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली
One Comment on “७ डिसेंबर रोजी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक”