N. Ch. Kelkar lecture series in the university
विद्यापीठात न. चिं. केळकर व्याख्यानमालेचे आयोजन
व्याखानमालेचा विषय ‘राष्ट्रीय जीवनात ऐतिहासिक अभिलेखांचे महत्व’
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात न. चिं. केळकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या इतिहास विभागाकडून ही व्याखानमाला घेण्यात येत असून डॉ. भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन हे यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहे. तर इतिहास विभागाचे निवृत्त विभागप्रमुख प्रा. दीपक गायकवाड या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असणार आहेत.
बुधवार २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या व्याखानमालेचा विषय ‘राष्ट्रीय जीवनात ऐतिहासिक अभिलेखांचे महत्व’ हा आहे. विद्यापीठाच्या इतिहास विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात हा कार्यक्रम दुपारी ३ वाजता होणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक डॉ. बाळासाहेब दुधभाते आणि विभागप्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी केले आहे.
‘Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
मार्ड’ संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध
One Comment on “विद्यापीठात न. चिं. केळकर व्याख्यानमालेचे आयोजन”