1720 crore fund for the first phase of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी
मुंबई : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी‘ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये 6000 या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी 6000 इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १७२० कोटी निधी”