नन्हें फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत 520 मुलांची आपापल्या कुटुंबांशी घडवली पुनर्भेट

रेल्वे संरक्षण दल Railway Protection Force हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

520 children reunited with their families under Nanhe Ferishte’ campaign

नन्हें फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत 520 मुलांची आपापल्या कुटुंबांशी घडवली पुनर्भेट

यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आरपीएफने ‘नन्हें फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत 520 मुलांची आपापल्या कुटुंबांशी घडवली पुनर्भेट

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना निर्धोक, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दल अहोरात्र कार्यरत असते.यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात, आरपीएफने विविध मोहिमांच्या माध्यमातून प्रशंसनीय कामगिरी करून दाखवली आहे:-रेल्वे संरक्षण दल Railway Protection Force हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मोहीम “नन्हें फरिश्ते” – हरवलेल्या मुलांची सुटका: “नन्हें फरिश्ते” या मोहीमेअंतर्गत आरपीएफने काळजी तसेच संरक्षणाची गरज असलेल्या 520हून अधिक लहान मुलांची त्यांच्या कुटुंबाशी पुनर्भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ही मुले विविध कारणांमुळे आपापल्या कुटुंबांपासून दुरावली होती.

मानवी तस्करी विरोधी उपक्रम (एएएचटी मोहीम) – नोव्हेंबर 2023 मध्ये आरपीएफच्या मानवी तस्करी विरोधी पथकांनी (एएचटीयुज) तस्करांच्या तावडीतून 35 जणांची सुटका केली.

मोहीम “जीवन रक्षा” – जीव वाचवणे: आरपीएफमधील जवानांच्या सावध तसेच जलद कृतीमुळे 224 प्रवाशांचा जीव वाचला. चालत्या गाडीतून चढता-उतरताना अपघाताने फलाटावर तसेच रेल्वेच्या रुळांवर पडल्यामुळे या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

महिला प्रवाशांचे सक्षमीकरण – “मेरी सहेली” उपक्रम: नोव्हेंबर 2023 मध्ये 229 “मेरी सहेली” पथकांनी 13,552 रेल्वे गाड्यांना भेटी दिल्या आणि 410,259 महिला प्रवाशांना सुरक्षितताविषयक सेवा दिली. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्ब्यातून प्रवास करताना आढळून आलेल्या 4618 व्यक्तींविरुद्ध देखील आरपीएफने कारवाई केली.

तिकीटांच्या दलालांचे गैरव्यवहार रोखणे (मोहीम “उपलब्ध”): तिकीट दलालांविरुद्धच्या कारवाईदरम्यान आरपीएफने नोव्हेंबर 2023 मध्ये 392 जणांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई केली. तसेच, आरपीएफच्या जवानांनी 42.28 लाख रुपयांची आगामी काळातील तिकिटे जप्त केली.

मोहीम “नार्कॉस” – अंमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांशी लढा: या मोहिमेअंतर्गत अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करत नोव्हेंबर 2023 मध्ये आरपीएफने 91 व्यक्तींना अटक केली आणि 3.69 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले.

प्रवाशांच्या समस्यांना जलद प्रतिसाद: नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे प्रवाशांनी नोंदवलेल्या 21,800 हून अधिक तक्रारींना प्रतिसाद देत, आरपीएफने या तक्रारी सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली.

मोहीम “यात्री सुरक्षा” – प्रवाशांचे संरक्षण: नोव्हेंबर2023 मध्ये आरपीएफने प्रवाशांविरुद्धच्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 229 गुन्हेगारांना अटक केली आणि त्यांना पुढील कारवाईसाठी संबंधित जीआरपी/पोलीस दलाच्या ताब्यात दिले.

“संरक्षा मोहिमे”च्या माध्यमातून सुरक्षिततेची सुनिश्चिती: आरपीएफने चालत्या रेल्वे गाड्यांवर दगड भिरकावण्याची धोकादायक कृती करणाऱ्या 28 जणांना नोव्हेंबर 2023 मध्ये अटक केली.

गरजू प्रवाशांना मदत (मोहीम सेवा): नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान आरपीएफने 191 वयोवृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना आवश्यक मदत पुरवली.

बेकायदेशीर वस्तूंच्या वाहतुकीला अटकाव (मोहीम सतर्क): आरपीएफने बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेली 10,54,630 रुपये मूल्याची तंबाखू उत्पादने आणि मद्य जप्त केले आणि या वाहतुकीशी संबंधित 67 जणांना ताब्यात घेऊन संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्द केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) शैक्षणिक वर्ष 2024-2027 साठी मान्यता प्रक्रिया हँडबुक केले प्रकाशित
Spread the love

One Comment on “नन्हें फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत 520 मुलांची आपापल्या कुटुंबांशी घडवली पुनर्भेट”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *