Nari Shakti Bill passed in Rajya Sabha
नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर
महिलांसाठी गौरवाचा क्षण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांनी केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयाचे स्वागत
मुंबई : महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज महिला विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहे. या कायद्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. हा निर्णय देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णय क्षमतेमुळे हा निर्णय होऊ शकला आहे. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री मोदीजींचे अभिनंदन करतो.
आमच्या शासनाने ही प्रधानमंत्री मोदीजींच्या प्रेरणेतून नमो महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिलांना विविध शासकीय योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर”