२२ जुलै २३ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धा – २०२३

Cycling-Image

Pune District Education Board Organized National and State Level Cycle Competition – 2023

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धा – २०२३

राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन

Cycling-Image
Cycling Image – Pixabay.com

हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. २२ जुलै २३ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

स्पर्धेचे हे सलग आठवे वर्ष आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची व सायकलींग फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनची पुणे ते बारामती सायकल स्पर्धा घेण्यात यावी अशी मागणी असते. म्हणून यावर्षी २२ जुलै २०२३ रोजी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकल स्पर्धा घेण्यात येत आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीस “बारामती होस्टेल ते हडपसर सायकल रॅली” (न्यूट्रल झोन) होणार आहे. सायकल रॅली बारामती होस्टेल, गोखलेनगर, पुणे येथून स. ८.०० वा. सुरू होऊन पुढे पेन्सिल चौकातून उजव्या हाताला वळून सिम्बाएसेस कॉलेज मार्गे – एनसीसी मुख्य ऑफीस वरून उजव्या हाताला वळून – लॉ कॉलेज रोडने – नळस्टॉप चौकातून डाव्या हाताला वळून – कर्वेरोडमार्गे – लकडीपूल – अलका चौक- डावीकडे वळून टिळक रोड – स्वारगेट – सेव्हन लव्ह चौक – गोळीबार मैदान रेसकोर्स मैदान – भैरोबा नाला मार्गे हडपसरला पोहोचेल.

पुणे से हडपसर पर्यंत स्पर्धेचा मार्ग स्पर्धाविरहीत (न्यूटल झोन) असून त्यामध्ये अंदाजे ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत. मुख्य राष्ट्रीय व राज्यस्तर सायकल स्पर्धेचा मार्ग:- पुणे (हडपसर) ते बारामती असा आहे.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९.०० वा. हडपसर (ग्लायडिंग सेंटर) येथे मा. आदर पुनावाला, उद्योजक यांचे शुभहस्ते होणार आहे .

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
२३ जुलै रोजी आयोजित जेजुरी येथील महारोजगार मेळावा रद्द
Spread the love

One Comment on “२२ जुलै २३ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धा – २०२३”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *