National Consumer Helpline 2.0 will provide better redressal of consumer complaints
नवीन तंत्रज्ञानासह राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 2.0 ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण अधिक चांगल्या पद्धतीने करेल.’ – राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली: ग्राहक व्यवहार विभागाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय ग्राहक दिन 2023 साजरा केला आणि ग्राहक संरक्षण आणि तक्रार निवारणासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यावर भर दिला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणात ग्राहकांचे समाधान हा देशाच्या विकासाचा मार्ग आहे हे अधोरेखित केले.
विभागाच्या नवीन उपक्रमांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, “ई-जागृती पोर्टल सुरू करणे, एनसीडीआरसीसाठी व्हीसी सुविधा, एनटीएचमध्ये ड्रोन चाचणी, 17 भाषांमध्ये राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 2.0 आणि कॉल्समध्ये 13 पट वाढ ह्या सर्व गोष्टी ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांची उदाहरणे आहेत. नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्युसीओएस) बाजारातील वस्तूंच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम करतात.
जुनी प्रलंबित प्रकरणे पूर्णपणे मार्गी लावण्यासाठी आणि नवीन प्रकरणे अधिक जलद आणि वेळेवर सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहक आयोगाच्या सहकार्याने धोरण आखण्याचे आवाहन पियुष गोयल यांनी ग्राहक व्यवहार विभागाला केले.
चांगल्या ग्राहक भविष्यासाठी, पियुष गोयल यांनी विभागाला जागरूकता निर्माण करून , निवडीसाठी पर्याय उपलब्ध करून कार्यक्षम तक्रार निवारण आणि सतत अभिप्राय देऊन ग्राहक जागृतीला एक जनचळवळ बनविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय ग्राहक दिन, 2023 च्या निमित्ताने, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पुढील उपक्रम सुरू केले:
-
1. ग्राहक आयोगासाठी ई-जागृती पोर्टलचे उद्घाटन
-
2. एनसीडीआरसी मधील व्हीसी सुविधेचे उद्घाटन
-
3. एनटीएच येथे ड्रोन प्रमाणपत्र सुविधेचे उद्घाटन.
-
4. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 2.0 चे उद्घाटन.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे राज्यमंत्री, अश्विनी कुमार चौबे यांनी बीआयएस, कायदेशीर मेट्रोलॉजी आणि नॅशनल टेस्ट हाऊसच्या माध्यमातून स्वयंचलित प्रक्रिया केल्याबद्दल ग्राहक व्यवहार विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विकास, सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्सची अंमलबजावणी, ऑनलाइन पोर्टल आणि चाचणी सुविधांचे अद्ययावतीकरण, तंत्रज्ञानाच्या जलद विकासामुळे आणि ई-कॉमर्समधील वाढीमुळे ग्राहक नवीन जोखीम आणि आव्हानांना बळी पडतात. त्यामुळे ग्राहक हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ग्राहक हक्कांची प्रकरणे प्रभावीपणे आणि वेळेवर निकाली काढणे अत्यंत आवश्यक आहे यावर त्यांनी जोर दिला.
ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव, रोहित कुमार सिंग यांनी त्यांच्या प्रास्ताविकात विभागाच्या अलीकडील कामगिरीची माहिती, प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी सरकारने हाती घेतलेले मोठे उपक्रम आणि चाचणी मानकांच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या कामगिरीची माहिती दिली. त्यांनी हमी दिली की, “ विविध प्रकरणांचे त्वरित निकाल लावण्यासाठी आणि प्रभावी कारभारासाठी तंत्रज्ञान एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी रणनीती राबविण्यासाठी हा विभाग कटिबद्ध आहे. धोरणात्मक स्तरावर ग्राहक संरक्षण मजबूत करणे आणि भारताच्या विकासात सक्रियपणे योगदान देणे हा या मागचा उद्देश आहे
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 2.0 ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण अधिक चांगल्या पद्धतीने करेल”