Organized National Dissemination Program by Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय प्रसार कार्यक्रमाचे आयोजन
विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरण संस्कृतीचे बळकटीकरण आणि विस्तार” या विषयावर हा कार्यक्रम
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे रिसोर्स फॉर इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया (RISHII) च्या अंतर्गत ” विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरण संस्कृतीचे बळकटीकरण आणि विस्तार” या विषयावर हा कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम सोमवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तैवानच्या शिक्षण मंत्रालयाचे संचालक पीटर्स एल. वाय. चेन यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्धाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होईल. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय खरे असतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे रिसोर्सेस फॉर इंटरनॅशनललायझेशन ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया (RISHII) या प्रकल्पाचे भागीदार आहेत. या प्रकल्पात विद्यापीठासह १३ भारतीय शिक्षण संस्था तसेच युरोपातील ५ नामांकीत विद्यापीठांचा समावेश आहे.
या प्रकल्पाला युरोपियन कमिशनद्वारे अर्थसहाय्य मिळाले असून विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे या प्रकल्पाचे टीम लीडर आहेत. RISHII प्रकल्पाच्या मदतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील उच्च शिक्षण संस्थांना अभ्यासक्रमाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी आवश्यक असलेली साधने, मानवी संसाधने आणि व्यावसायिक विकास यंत्रणा पुरवून मदत करत असते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे राष्ट्रीय प्रसार कार्यक्रमाचे आयोजन”