A seminar on National Education Policy and Indian Knowledge Tradition at Bhandarkar Institute
भांडारकर संस्थेत राष्ट्रीय शिक्षण धोरण व भारतीय ज्ञान परंपरा यावरील चर्चासत्राचे आयोजन
पुणे – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीने येत्या सोमवारी (21 ऑगस्ट) राष्ट्रीय शिक्षण धोरण व भारतीय ज्ञान परंपरा यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी यादव यांच्या हस्ते होणार असल्याचे संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी आज येथे सांगितले.
संस्थेच्या नवलमल फिरोदिया प्रेक्षागृहात सकाळी 9.30 ते दुपारी 4 या वेळेत होणार्या या चर्चासत्राचे बीजभाषण आय.आय.एम.बेंगळूरूचे प्राध्यापक डॉ. बी. महादेव करणार आहेत तर डॉ. प्रदीप आपटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांची व्याख्याने होणार आहेत. चर्चासत्राचा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर करणार आहेत.
यावेळी अधिक माहिती देतांना प्रा. वैशंपायन म्हणाले की, या चर्चासत्राचा उद्देश नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रारूप, त्यातील बदल, या बदलांची आणि प्रारूपाची अंमलबजावणी, त्यातील विषय अशा महत्त्वाच्या घटकांवर उपस्थितांचे उद्बोधन करणे हा आहे. तसेच या नव्या धोरणानुसार भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय, त्यातील विषय-उपविषय, या विस्तृत विषयातील कोणकोणते घटक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यामध्ये महाविद्यालये, विद्यापीठे, संलग्न विभाग यांची भूमिका या विषयांवरही विस्तारपूर्ण विवेचन होणार आहे. या चर्चासत्रासाठी विद्यापीठांतील व महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक व समन्वयक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राष्ट्रीय शिक्षण धोरण व भारतीय ज्ञान परंपरा यावरील चर्चासत्राचे आयोजन”