National Marathi Poetry Conference on Wednesday at Balgandharva Rangmandir on the occasion of Amrit Festival of Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात बुधवारी राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी सायं. ४.०० वा. बालगंधर्व रंगमंदिर (पुणे) येथे राष्ट्रीय मराठी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या काव्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार उपस्थित राहणार असून काव्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आहेत.
या काव्य संमेलनात कवी अरुण म्हात्रे (मुंबई), इंद्रजित भालेराव (परभणी) कल्पना दुधाळ (उरुळी कांचन), प्रकाश घोडके (मिरजगाव), सरिता पवार (सिंधुदुर्ग), अंजली कुलकर्णी (पुणे), सचिन केतकर (बडोदा), डॉ. संतोष पवार (श्रीरामपूर), संजीवनी ताडेगावकर (जालना), भरत दौंडकर (शिक्रापूर), डॉ. स्मिता पाटील (मोहोळ), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), अविनाश भारती (बीड), हेमंत अय्या (गोवा), तुकाराम धांडे (अकोले), प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर) हे राष्ट्रीय पातळीवरील कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रकाश घोडके व अरुण म्हात्रे करणार आहेत.
या काव्य संमेलनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, विद्यापीठ अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या काव्य संमेलनाचे संयोजन राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. धोंडीराम पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्रीमती बागेश्री मंठाळकर, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ.संदीप सांगळे यांनी केले आहे.
या काव्य संमेलनास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. सागर वैद्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. संगीता जगताप, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे उपस्थित राहणार आहेत.
हे राष्ट्रीय काव्य संमेलन समाजातील सर्व रसिकांसाठी असून यात नागरिक विद्यार्थी प्राध्यापक यांनी उपस्थित राहावे, प्रवेश विनामूल्य आहे. अशी माहिती विद्यापीठ अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय मराठी काव्य संमेलन”