A two-day National Seminar on Indian Culture at the University
भारतीय संस्कृतीवर विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
संस्कृत आणि प्राकृत (सी. ए. एस.एस.) विभाग आणि प्रबोधन मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘भारतीय संस्कृतीची ओळख’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ मार्च रोजी होणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘बृहत्’चे संस्थापक श्री. राघव कृष्ण, श्री वेंकटेश्वर वैदिक विद्यापीठ तिरुपतीचे कुलगुरू डॉ. आर. सदाशिव मुर्ती उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह संस्कृत आणि प्राकृत विभाग प्रमुख डॉ. देवनाथ त्रिपाठी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि या चर्चासत्राचे आयोजक श्री. रविंद्र शिंगणापूरकर, प्रबोधन मंच, पुणेचे श्री. हरीभाऊ मिरासदार उपस्थित असतील.
संस्कृत आणि प्राकृत (सी. ए. एस.एस.) विभाग आणि प्रबोधन मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा सखोल अभ्यास आणि त्यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राचे उद्घाटन ६ मार्चला सकाळी 10.00 वाजता विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे.
या दोन दिवसीय चर्चासत्रात देशभरातील विविध मान्यवर भारतीय तत्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा, भारताची साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळख, परंपरा, चालीरीती आणि भारतीय सांस्कृतिक एकात्मता, भारतीय संत परंपरा, भारतीय उत्सव परंपरा, प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक आध्यात्मिक चळवळ आणि भारत, संस्कृत साहित्य यांसारख्या विविध विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
या चर्चासत्राच्या समारोपाचा कार्यक्रम ७ मार्च रोजी संध्याकाळी 04.45 वाजता ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, भारतीय भाषा प्रशालेचे प्रमुख प्रा.प्रभाकर देसाई हे उपस्थित असतील.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
‘कवियत्री शांता शेळके’ सभागृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
One Comment on “भारतीय संस्कृतीवर विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र”