विद्यापीठात ‘टेक विंटेज’ राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न

Savitribai Phule Pune Universiy

National seminar on ‘Tech Vintage’ concluded with enthusiasm in the university

विद्यापीठात ‘टेक विंटेज’ राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्नSavitribai Phule Pune University

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘टेक विंटेज – व्यवसायातील डिजिटल परिवर्तन’ या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (पुंबा)च्या वतीने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कायनेटिक कॉम. लिचे संचालक डॉ. दीपक शिकारपूर, ग्लोबल फिन्टेक लीडर श्री. महेश गोखले, एसपीपीयू स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक डॉ. प्रफुल्ल पवार, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील आणि डॉ. सीए शिल्पा भिडे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना डॉ. दीपक शिकारपूर यांनी डिजिटल तंत्रज्ञानातील उत्क्रांतीविषयी उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी झालेल्या “टेक विंटेज: सोल्युशन्स फॉर फ्युचर” या विषयावरील पॅनेल डिस्कशनचे संचालन डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसचे प्राध्यापक डॉ. राजेश पहूरकर यांनी केले. पॅनेलमध्ये शालिनी शर्मा (हेड कॉर्पोरेट कम्युनिकेशन, ॲटलस कॉप्को ग्रुप), नेहा व्यास (संचालक – टॅलेंट एक्विझिशन, पॅटर्न), लेफ्टनंट कर्नल शंतनू रॉय (सह-संस्थापक, सिंकथ्रेड्स कॉम्प्युटिंग सोल. एलएलपी), आणि समीर बडवे (ए. बी. प्रोसेस टेक्नॉलॉजीज) यांचा समावेश होता.

सकाळ माध्यम समूहाचे सीएचआरओ श्री. विनोद बिडवाईक यांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय शक्तीवर मार्गदर्शन केले. श्री चारुकेश गायकवाड (संचालक, EY) यांनी प्रशासन, जोखीम व्यवस्थापन, अनुपालन याविषयी माहिती दिली.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर यांनी शिक्षणातील डिजिटल तंत्रज्ञानाविषयी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. तर रुबिस्केपचे संस्थापक आणि सीईओ डॉ. प्रशांत पानसरे यांनी तंत्रज्ञानाने लोकांचे जीवन कसे बदलले आहे, ते सर्वसमावेशक बनवून व्यवहारात पारदर्शकता कशी निर्माण केली आहे, याविषयी सांगितले.

विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन तंत्रज्ञान, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन बिझनेस याविषयी सविस्तर माहिती मिळवली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प

Spread the love

One Comment on “विद्यापीठात ‘टेक विंटेज’ राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *