नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Navdurga 'Jagar Stree Shakti' cultural programme नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Spontaneous response to Navdurga ‘Jagar Stree Shakti’ cultural programme

नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रम तुळशीबाग येथील हर्ष लॉनमध्ये पार पडला. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.Spontaneous response to Navdurga 'Jagar Stree Shakti' cultural programme
नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना जसे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनाबाबत माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली गेली. सोबत साडेतीन शक्तीपीठांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्राची भूमी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. या शक्तिमातांची थोरवी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आली. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील सहा महसूली विभागाच्या मुख्यालयी व साडेतीन शक्तीपीठाच्या ठिकाणी, या कार्यक्रमाचे आयोजन १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान करण्यात येत आहे. भक्ती, लोकसंस्कृती व लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात, महाराष्ट्र शासनाच्या महिला विषयक योजनांविषयी आगळ्यावेगळ्या माध्यमाद्वारे माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये आघाडीच्या नृत्यांगना, गायिका, अभिनेते, उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या प्रिती मानमोडे व मनिषा काशिकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, समन्वय श्री. देसाई उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
महिला सक्षमीकरणासाठी आठ कलमी कृती कार्यक्रम गरजेचा
Spread the love

One Comment on “नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *