Nawab Malik was remanded in judicial custody till March 21
नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई : गेले १३ दिवस ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्याक व्यवहार मंत्री नवाब मलिक यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
दहशतवाद्यांशी आर्थिकसंबंध असल्याच्या आरोपावरुन राष्ट्रीय तपास संस्थेनं मलिक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलं आहे. त्याच्या आधारे ईडीनं त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
त्यांची ईडी कोठडी आज संपत असल्यानं त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना येत्या २१ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिका
मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र त्यावर अद्याप सुनावणी व्हायची आहे.