New rules apply under plastic waste management regulations
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत नवीन नियम लागू
नवी दिल्ली: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 अंतर्गत पॅकेजिंगबाबत विस्तारित उत्पादक उत्तरदायीत्व मार्गदर्शक तत्वे अधिसूचित केली आहेत.1 जुलै 2022 पासून, कमी उपयुक्तता आणि जास्त कचरा निर्माण करण्याची क्षमता असलेल्या म्हणून निश्चित केलेल्या एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या प्रतिबंधासह, विस्तारित उत्पादक उत्तरदायीत्व मार्गदर्शक तत्वे हे देशातील प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्लास्टिक उत्पादकांची जबाबदारी निश्चित करणारी अधिसूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, त्यानुसार ही पावलं उचलण्यात आली आहेत.
प्लास्टिक कचरा कमीतकमी तयार व्हावा, त्याचं पुनर्चक्रीकरण व्हावं, तसंच प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने हे दिशानिर्देश बनवण्यात आले असून उत्पादकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था, दुकानदार, ग्राहक यांच्याही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.