New rules for Pune city from Monday. Citizens are expected to follow the rules and behave consistently.
Criteria and levels were set for restrictions in Break the Chain. Five levels of restrictions were set to break the chain of the coronavirus and, on the other hand, to see how our economic, social, and daily activities would begin in a disciplined manner. The criteria for determining these levels will be the daily availability of oxygen beds and the weekly positivity rate. Accordingly, the local administration has decided on the restrictions as per the norms.
Hotels, bars, restaurants, and food courts in Pune will be open from Monday to Friday from 4 pm.
Public places, parks, and grounds within the municipal limits will continue from 5 am to 9 am.
Permission has been granted for the social, religious, and entertainment program in the presence of fifty people from Monday to Friday at 4 p.m.
Fifty people are allowed to attend the wedding.
Exercise schools, salons, beauty parlors, spas will continue until 4 pm at 50 percent of seating capacity.
PMPML is allowed to start at 50 percent capacity.
An inter-district ban has also been lifted.
After the relaxation of restrictions, citizens are expected to follow the rules of health and behave in a cowardly manner during this period of cowardice. It is necessary to cooperate with the decision taken by the municipal administration.
सोमवारपासून पुणे शहरासाठी नवीन नियमावली. नागरिकांनी नियम पाळून कोविड सुसंगत वर्तणूक करणे अपेक्षित.
ब्रेक दि चेनमधील निर्बंधांसाठी निकष आणि पातळ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे ह्या करीता निर्बंधांच्या ५ पातळ्या ठरविण्यात आल्या. या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेड्सची दैनंदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येणार आहेत . त्याला अनुसरून स्थानिक प्रशासनाने निकषानुसार निर्बंधाबाबत निर्णय घेतला आहे.
पुणे शहरात येत्या सोमवारपासून शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील.
सामाजिक धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत ला परवानगी आहे.
व्यायाम शाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
पी एम पी एम एल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच आंतरजिल्हा बंदी सुद्धा उठवण्यात आली आहे.
निर्बंधात शिथिल ता आल्या नंतर नागरिकांना कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक करणे अपेक्षित आहे. महानगरपालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करणे आवश्यक आहे.