Hadapsar market came to a standstill on the fifth Sunday.
Among a massive spurt in the COVID 19 number of cases, the Pune administration imposed a complete weekend lockdown (Saturday and Sunday)in the city. These restrictions were brought in place in light of the increasing number of Covid-19 cases in the city from the first week of April. The Hadapsar market was dry due to the weekend lockdown. All transactions except essential services in the Hadapsar market came to a standstill on the fifth Sunday after strict restrictions were imposed on Corona’s background. Rickshaws and other vehicles were a bit crowded on the road till eleven o’clock in the morning.
All transactions in Hadapsar Gadital Chowk, Gandhi Chowk, Magarpatta Chowk, Ramtekdi, Fursungi, Devachi Uruli area, Shewalewadi, Manjari, and Mahadev Nagar area were closed. So the road became vacant. On some of the roads were heavily guarded by police. Police were also investigating the citizens for traveling on the road without any reason, fines were collected from some citizens who were traveling without any valid reason. Most of the grocery stores were also closed on Sunday.
According to the guidelines, only pharmaceutical shops are allowed to function during the weekend lockdown. The movement of citizens on the fifth-weekend lockdown was significantly less than the last two weekends. Only milk shops were functioning in the morning and medical organizations like medical shops, laboratories were open for function on the weekend lockdown. Grocery shops are to be shut while citizens are not allowed to move around without a valid reason to travel.
विकेंड लॉकडाऊनमुळे हडपसर बाजारपेठेत शुकशुकाट.
कोविड १९ च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालयामुळे , पुणे प्रशासनाने शहरात शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाउन लागू केले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील कोविड -१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे निर्बंध आणण्यात आले.शनिवार-रविवार विकेंड लॉकडाऊनमुळे हडपसर बाजारपेठेत शुकशुकाट होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागल्यानंतर पाचव्या रविवारी हडपसर बाजारपेठेमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. रस्त्यावर रिक्षा आणि इतर वाहनांची सकाळी अकरा वाजेपर्यंत काहीशी वर्दळ होती.
हडपसर गाडीतळ चौकामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
हडपसर गाडीतळ चौक , गांधी चौक, मगरपट्टा चौक, रामटेकडी, फुरसुंगी, देवाची उरुळी परिसर शेवाळेवाडी ,मांजरी , आणि महादेव नगर परिसरातील सर्व व्यवहार बंद होते . त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. काही रस्त्यावर चौकामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची पोलीस चौकशी करत होते. काही जणांकडून दंडही वसूल करण्यात आला. रविवार असल्यामुळे बहुतांश किराणा दुकाने बंद होती.
मार्गदर्शक सूचनांनुसार, शनिवार व रविवार लॉकडाऊन दरम्यान सकाळी फक्त दुधाच्या दुकानना आणि औषधाची दुकाने वैद्यकीय प्रयोगशाळा यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. पाचव्या-आठवड्याच्या लॉकडाउनवर गेल्या दोन आठवड्या पेक्षा गर्दी कमी होती. सकाळी फक्त दुधाची दुकाने उघडली होती आणि वैद्यकीय दुकाने, प्रयोगशाळा यासारख्या वैद्यकीय संस्था शनिवार व रविवारच्या लॉकडाऊनमध्ये कामासाठी खुल्या होत्या.
Blood donation camp by Lingayat Seva Mandal Hadapsar and Nilkantheshwar Lingayat Vadhu Var Mandal.
Corona epidemics can cause blood shortage, according to blood banks in Pune. People between the ages of 18 and 44 are urged to donate blood before taking the covid vaccine. The third phase of vaccination for 18- to 44-year-olds has started at limited centers across the state, and many doctors and blood banks have appealed to people to donate blood before getting vaccinated against Kovid-19. Those who have been vaccinated cannot donate blood or blood products for 28 days after vaccination, which can lead to anemia.
In the Corona epidemic, to fill the huge shortage of blood created,
Lingayat Seva Mandal Hadapsar and Nilkantheshwar Lingayat Vadhu Var Mandal have organized blood donation camps considering the need for blood and corona in conditions. We all should donate blood/plasma before getting vaccinated. Such an appeal has been made by Lingayat Seva Mandal Hadapsar and Nilkantheshwar Lingayat Vadhu Var Mandal.
Blood Donation Camp has been organized on 14th May 2021 at Nilkantheshwar Temple, Near Kubera Complex, Hadapsar Train Pune 411028 from 9 am to 3 pm. The organization has informed that the following link should be used for the registration of blood donation.
For more information contact Mr. Prakash Digole 8668318670 and Mr. Rajendra Kanade
Contact 9371013161.
लिंगायत सेवा मंडळ हडपसर आणि निळकंठेश्र्वर लिंगायत वधू वर मंडळ यांच्या तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन .
कोरोना महामारीत रक्ताचा तुडवडा भासु शकतो, यामुळे पुण्यातील रक्तपेढ्यानी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांना कोविड लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरातील मर्यादित केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे, तसेच कोविड -१९ विषयी लसीकरण करण्यापूर्वी लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन अनेक डॉक्टर आणि रक्तपेढींनी केले आहे. ज्यांनी लस घेतली आहे ते लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्त किंवा रक्त उत्पादनांचे दान करू शकत नाहीत ज्यामुळे रक्ताची कमतरता भासू शकते.
कोरोना महामारीत , निर्माण झालेला रक्ताचा प्रचंड तुटवडा भरून काढण्यासाठी , लिंगायत सेवा मंडळ हडपसर आणि निळकंठेश्र्वर लिंगायत वधू वर मंडळ, रक्ताची गरज आणी कोरोना परिस्थिती पाहून त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे,तरी आपण सर्वांनी लस घेण्यापूर्वी ब्लड/प्लाझ्मा दान करावे . असे आवाहन लिंगायत सेवा मंडळ हडपसर आणि निळकंठेश्र्वर लिंगायत वधू वर मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले आहे .
रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १४ मे २०२१ रोजी निळकंठेश्र्वर मंदिर , कुबेरा संकुल शेजारी, हडपसर गाडीतळ पुणे ४११०२८ येथे सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत करण्यात आले आहे.
रक्तदानाची नोंदणी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री.प्रकाश डिगोळे 8668318670 व श्री.राजेंद्र कानडे
9371013161 याच्याशी संपर्क साधावा.
Deputy Chief Minister Ajit Pawar pays homage to former MP Sambhajirao Kakade.
Deputy Chief Minister Ajit Pawar has expressed grief over the demise of senior leader and former MP Sambhajirao Kakade and paid heartfelt tributes to him.
In his condolence message, Deputy Chief Minister Ajit Pawar says that Sambhajirao Kakade Saheb was a leader who worked tirelessly for the overall development of the common man. He worked all his life for the upliftment of the peasants, the hardworking, the weak, the deprived, the neglected. Contributed significantly to the development of the Pune district. He will always be remembered as a heroic, principled leader working in various fields of social life such as politics, sociology, and co-operation. Sambhajirao Kakade Saheb was known as ‘Lala’ in public life. His demise is a great loss to the political and social sphere of Pune district. The district has lost senior, guiding leadership.
I, the Pawar family, and the NCP share the grief of the Kakade family and activists. In his condolence message, Deputy Chief Minister Ajit Pawar has also prayed for the recovery of late Sambhajirao Kakade.
माजी खासदार संभाजीराव काकडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
ज्येष्ठ नेते, माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, संभाजीराव काकडे साहेब सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील. संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्व गमावलं आहे.
मी, पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काकडे कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.
Deputy Chief Minister Ajit Pawar pays homage to former MLA Prakashdada Dahake.
Deputy Chief Minister Ajit Pawar has expressed grief over the demise of the former MLA of Karanja Manora Assembly constituency in Washim district, NCP leader Prakash Dada Dahake. With the demise of Prakashdada Dahake, the struggling leadership that was united with the rural masses and worked tirelessly to alleviate the sufferings of the farmers and hardworking brothers has been lost. Prakash Dada’s demise is a great loss to the Karanja Manora Assembly constituency, the political and social movement in Washim district, and the NCP.
I pay a heartfelt tribute to the late Prakashdada. We all share the grief of Dahake’s family and activists, said Deputy Chief Minister Ajit Pawar.
More about this source textSource text required for additional translation information.
माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशदादा डहाके यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रकाश दादा डहाके यांच्या निधनानं ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेलं, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. प्रकाश दादांचं निधन ही कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाची, वाशिम जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक चळवळीची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी आहे.
मी स्वर्गीय प्रकाश दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सर्वजण डहाके कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
Prevent child marriage during the lockdown period, Collector Dr. Rajesh Deshmukh.
Rajesh Deshmukh has given instructions for preventive measures that should be taken to prevent child marriage in the Pune district and if child marriage is noticed, legal action should be taken immediately.
One of the major problems facing the Corona epidemic is the increase in child marriage. During the period of one year from April 2020 to April 2021, the administration has succeeded in preventing a total of 560 child marriages in different parts of the state. A letter has been received from the Central and State Governments regarding the prevention of child marriage in marriages taking place on the occasion of Akshay Tritiya. According to the Prevention of Child Marriage Act 2006, child marriage is illegal and a case is expected to be registered against it. In connection with the implementation of this Act, Gram Sevaks for rural areas and Child Development Project Officers for urban areas have been appointed as Child Marriage Prevention Officers. Through this, more efficient efforts should be made to prevent child marriage and protect child rights. Rajesh Deshmukh has said.
Preventive measures should be taken to prevent child marriage in the Pune district and if such child marriage is noticed, immediate legal action should be taken against it. Sevika of District Child Protection Cell, that the process of child marriage should be stopped immediately.
टाळेबंदीच्या कालावधीत होणारे बालविवाह रोखण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या सूचना.
पुणे जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात इतर समस्यासोबत भेडसवणारी महत्त्वपूर्ण समस्या म्हणजे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यातील वेगवेगळया भागात एकूण ५६० बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहात बालविवाह रोखण्यासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार बालविवाह बेकायदा ठरतात आणि त्याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या माध्यमातून बालविवाह रोखणे व बाल हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे.
पुणे जिल्हयात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि असे बालविवाह लक्षात आल्यास त्यावर तातडीने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्या जिल्हयातील बालकल्याण समिती, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या निदर्शनास आणून तात्काळ बालविवाह थांबविण्याची प्रक्रिया करावी असे निर्देश संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.