औरंगाबादमधे बकासूर या कचरा वेचक यंत्राचं लोकार्पण

Inauguration of Bakasur garbage collector machine  in Aurangabad

औरंगाबादमधे बकासूर या कचरा वेचक यंत्राचं लोकार्पण

औरंगाबाद : औरंगाबाद इथं आगामी जी – 20 परिषदेच्या अनुषंगानं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत आज बकासूर या कचरा वेचक यंत्राचं लोकार्पण करण्यात आलं. पालकमंत्री संदिपान भुमरे आणि सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शहरातल्या क्रांतीचौकात या यंत्राचं लोकार्पण करण्यात आलं.

जी – 20 शिखर परिषदेनिमित्त शहरातल्या महत्वाच्या संघटना एकत्र येत टीम ऑफ असोसिएशन स्थापन केलं असून, त्यांच्या माध्यमातून हे यंत्र शहरात १२ फेब्रुवारीपर्यंत स्वच्छता करणार आहे.

११ आणि १२ फेब्रुवारीला प्रशासन आणि टीम ऑफ असोसिएशनच्या वतीनं शहर स्वच्छ अभियान राबवण्यात येणार आहे. याअनुषंगानं शहरातल्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक आज दुपारी चार वाजता सीएमआयए उद्योजक संघटनेच्या रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या कार्यालयात होणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरात जी-20 परिषदेअंतर्गत विदेशातल्या महिला प्रतिनिधींचं शिष्टमंडळ २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी येणार आहे. या महिलांचे शिष्टमंडळ ऐतिहासिक वारसा स्थळ असलेल्या बिबी का मकबरा, विद्यापीठ लेणी, सोनेरी महलला भेट देणार असल्याचं मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितलं.

औरंगाबाद पालिकेच्या वतीनं जी-20 परिषदेच्या निमित्ताने शहरात सौदर्यीकरण आणि सुशोभीकरणाची कामं हाती घेतली असून, ही कामं १५ फेब्रुवारीपर्यंत संपवण्याचे आदेश देण्यात आले आहे

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *