National Institute of Naturopathy, Pune in association with Regional Outreach Bureau holds marathon 100 days Yoga workshop series.
National Institute of Naturopathy (NIN), Pune in collaboration with the Regional Outreach Bureau (ROB) of the Ministry of I&B, has been conducting LIVE Yoga sessions under “Common Yoga Protocol” (CYP) through its YouTube Channel. The 100-day programme has been streaming online since 13th March 2021 for one hour daily from 7:00 am – 8:00 am in the run-up to International Yoga Day, whose theme is “Yoga for well-being”.
Director, NIN, Pune, Prof. K. Satya Lakshmi, said that yoga for wellness is an apt theme amidst the hardships posed by the pandemic. “These sessions have acted as an effective self-management strategy to cope with stress, anxiety and depression, and maintain well-being during the challenging time of COVID-19. The objective of the initiative was also to promote and reinforce CYP amongst the public” she added.
The online CYP sessions were based on Common Yoga Protocols curated by the Ministry of AYUSH. CYP is a specified sequence of Yoga drills of about 45 minutes duration. These live Yoga sessions were conducted through video conferencing mode in English, Hindi and Marathi and were screened through social media handles of the Regional Outreach Bureau, (Maharashtra and Goa) and NIN, Pune. All sessions can be accessed here https://www.youtube.com/c/MAHAROB/videos
Prakash Magdum, Director, National Film Archive of India and ROB, Pune said: “Keeping in mind the restrictions put in view of the pandemic, the rationale behind this initiative was to keep providing basic yoga training to people through online mode. The initiative is also in tandem with the Central Government’s call for this year’s International Yoga Day – Be with yoga, Be at home.”
Pandemic makes the public more conscious of Yoga
The 7th International Day of Yoga comes up at a time when the world is fighting COVID-19. In view of the restrictions on congregational activities, the lead event of the International Day of Yoga (IDY) 2021 will be a televised programme, scheduled to begin at 6.30 a.m. which will include the address by Prime Minister Shri Narendra Modi.
IDY over the years has not only boosted Yoga’s popularity but also expanded its geographical presence by inspiring its adoption in several new territories. https://yoga.ayush.gov.in/public/assets/front/pdf/CYPEnglishBooklet.pdf
100 दिवसांची मॅरेथोन योग कार्यशाळा मालिका यशस्वी.
पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने योगदिनानिमित, प्रादेशिक लोकसंपर्क विभागाच्या सहकार्याने 100 दिवसांची मॅरेथोन योग कार्यशाळा मालिका यशस्वी.
माहिती आणि प्रसारण ,मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (आरओबी) आणि पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने संयुक्तपणे आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ‘सामान्य योगाभ्यास नियम’ अंतर्गत थेट योगाभ्यास सत्रे घेण्यास सुरुवात केली आहे.
100 दिवस चालणारी ही सत्रे 13 मार्च 2021पासून दररोज सकाळी सात ते आठ या वेळेत ऑनलाईन प्रसारित केली जात असून, आंतरराष्ट्रीय योगदिनापर्यंत ही सत्रे सुरु राहणार आहेत. या सत्रांची संकल्पना ‘कल्याणासाठी योग’ अशी आहे.
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा. के सत्यालक्ष्मी यांनी या सत्रांविषयी माहिती देतांना सांगितले की, सध्या कोविड महामारीच्या संकटकाळात ही संकल्पना अत्यंत चपखल आहे . “सध्या लोकांना आलेला तणाव, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी ही सत्रे अत्यंत प्रभावी स्वयं व्यवस्थापन शिकवणारी ठरली, कोविडच्या या आव्हानात्मक काळात लोकांचे कल्याण साधण्यासाठी या सत्रांचा मोठा लाभ झाला.या उपक्रमाचे उद्दिष्ट लोकांना योगाभ्यासाविषयक सर्वसामान्य नियमांची ओळख करुन देणे हेही होते.” असेही त्या म्हणाल्या.
ही ऑनलाईन सत्रे आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या सामान्य योगाभ्यास कार्यक्रमानुसार तयार करण्यात आली आहे. ‘सामान्य योगाभ्यास’ म्हणजे 45 मिनिटांच्या एका सत्रात सर्वसामान्यांना करता येणारी दैनंदिन आसने आणि प्राणायामाचा निश्चित कार्यक्रम आहे. ही लाईव्ह योगसत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून घेतली गेली आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो च्या (महाराष्ट्र आणि गोवा) तसेच एनआयएन पुणे यांच्या सोशल मिडीया पेजेसवरुन ती थेट दाखवण्यात आली. ही सर्व सत्रे खालील लिंकवर उपलब्ध आहेत. https://www.youtube.com/c/MAHAROB/videos
आरओबी तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले. “कोविड महामारीमुळे घालण्यात आलेली बंधने लक्षात घेता, हा उपक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश, लोकांना ऑनलाईन स्वरूपात योगाभ्यास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा होता. यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त केंद्र सरकारची संकल्पना, “योगासह रहा, घरीच रहा’ अशी असून हा उपक्रम त्या संकल्पनेशी सुसंगतचा ठरला, असेही त्यांनी सांगितले.
महामारीमुळे योगाभ्यासाकडे लोकांचा वाढता कल
सातवा जागतिक योगदिन अशा काळात आला आहे, ज्यावेळी, संपूर्ण जग कोविड-19 महामारीचा सामना करत आहे. विषाणू संक्रमण रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि संमेलनांवर निर्बंध आहेत, त्यामुळेच, यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य कार्यक्रम, दूरचित्रवाणीवरुन दाखवला जाणार आहे. 21 जूनला सकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. यावेळी पंतप्रधान जनतेशी संवादही साधतील.
गेल्या सात वर्षात आंतरराष्ट्रीय योगदिन अधिकाधिक लोकप्रिय झाला असून, जगभरातील नवनव्या प्रदेशातील अनेक लोक योगाकडे आकर्षित होत असल्याने, त्याचा भौगोलिक विस्तारही वाढला आहे.
https://yoga.ayush.gov.in/public/assets/front/pdf/CYPEnglishBooklet.pdf