Nine Vande Bharat Express flagged off by Prime Minister
पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा
११ राज्यांना जोडणाऱ्या ९ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांना जोडणाऱ्या ९ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला यावेळी प्रधानमंत्र्यांनी उपस्थितांना दूर दृश्य प्रणाली द्वारे संबोधित करतांना सांगितल की, नवीन वंदे भारत एक्सप्रेस देशातील सर्व धार्मिक स्थळांना जोडेल यामुळे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन तर मिळेलच तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल या रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेच्या दुहेरीकरण, विद्युतीकरणला आणि रेल्वे स्थानक विकासांना गती मिळणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे आधुनिक संपर्क सुविधा विकसित होतील अस प्रधानमंत्री म्हणाले.
या नऊ वंदे भारत गाड्यांचा एकाचवेळी शुभारंभ होणे म्हणजे देशातील आधुनिक दळणवळण सुविधा क्षेत्रासाठी अभूतपूर्व प्रसंग आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “देशातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची ही गती आणि व्याप्ती, 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी तंतोतंत जुळणारी आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. आज सुरू झालेल्या गाड्या अधिक आधुनिक आणि आरामदायी आहेत, असे त्यांनी सांगितले. या वंदे भारत गाड्या नव्या भारताच्या नव्या उत्साहाचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले. वंदे भारत विषयी लोकांमधील वाढत्या आकर्षणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. वंदे भारत गाड्यांमधून आतापर्यंत एक कोटी अकरा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहितीही त्यांनी दिली.
“भारतीय रेल्वे आणि समाजात प्रत्येक स्तरावर होत असलेले बदल हे विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरतील असा मला विश्वास आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप करताना सांगितले.
यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा”