जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही – डॉ. अनिल काकोडकर

The world has no choice but nuclear power - Dr. Anil Kakodkar जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही - डॉ. अनिल काकोडकर हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

The world has no choice but nuclear power – Dr Anil Kakodkar

जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही – डॉ. अनिल काकोडकर

ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृह आणि ‘क्लायमेट चेंज:ग्लोबल वॉर्मिंग’ प्रदर्शनाचे उद्धाटनThe world has no choice but nuclear power - Dr. Anil Kakodkar
जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही  - डॉ. अनिल काकोडकर
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

पुणे : विकसित देशांनी अणुशक्ती विषयी जगात भिती निर्माण करून ठेवली आहे. मात्र जर जगातील विषमता कमी करायची असेल तर सर्वांना समान उर्जा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन अणुऊर्जा शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रात ‘क्लायमेट चेंज : ग्लोबल वॉर्मिंग’ (एक आधुनिक दृक श्राव्य माध्यम) या प्रदर्शनाचे तसेच डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सभागृहाचे उद्धाटन समारोह आयोजित करण्यात आले होता. या समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या समारोहाचे अध्यक्षपदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. यावेळी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितिन करमरकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राचे समन्वयक डॉ. राजेंद्र देवपूरकर आदी उपस्थित होते.

अणुशक्तीचा शोध लागला तेव्हा त्यांची ओळख विध्वंसक शक्ती म्हणून होती. मात्र याचा उपयोग वीजनिर्मिती, शेती, कॅन्सरचा उपचार यांसारख्या लोकहीताच्या कामांसाठीही होत असतो. अणुशक्तीमुळे विकसित जग आणि विकसनशील-मागास जग अशी जगाची विभागणी झाली आहे. त्यामुळे जगात विषमता वाढली आहे. ही विषमता नष्ट करायची असेल तर नागरिकांचे राहणीमान सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी परदेशात उपलब्ध असलेली उर्जा आपल्याला मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. अनिल काकोडकर म्हणाले. अध्यक्षीय भाषण देताना कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राच्या स्थापनेमागील संकल्पना समजावून सांगितली. यावेळी केंद्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे डॉ. काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र देवपूरकर यांनी केले असून सुत्रसंचालन मृदृला कर्णी यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

‘क्लायमेट चेंज : ग्लोबल वॉर्मिंग’ (एक आधुनिक दृक श्राव्य माध्यम) प्रदर्शन

लहान मुलांना ग्लोबल वॉर्मिंगविषयी माहिती मिळण्यासाठी, त्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रात ‘क्लायमेट चेंज : ग्लोबल वॉर्मिंग’ (एक आधुनिक दृक श्राव्य माध्यम) हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभारण्यात आले आहे. ७ प्रोजेक्टर असलेल्या सेमी सर्कुलर आकाराच्या खोलीतील हे प्रदर्शन ३ डीमध्ये आहे. ग्लोबल वार्मिगचा भविष्यात सुंदरबन, हिमालयन रेंज, इत्यादींवर कसा परिणाम होईल, हे याद्वारे दाखविण्यात आले आहे. याप्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर आतापर्यंत डिज्ने किंवा डिस्कवरीवर मनोरंजनासाठी करण्यात आला आहे. मात्र कदाचित पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक बाबींसाठी होत असल्याचे या प्रदर्शनाचे निर्माते विजेंद्र पाटील यांनी सांगितले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत दुष्काळ निवारण कार्यशाळेचे आयोजन
Spread the love

One Comment on “जगाला अणुशक्ती शिवाय पर्याय नाही – डॉ. अनिल काकोडकर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *