सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयास सलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन

Minister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar’s office gets ISO rating for the second time in a row

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयास सलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकनMinister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार हडपसर क्राइम न्यूज हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई : नाविन्यपूर्ण संकल्पना, विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी, भेटायला येणाऱ्या नागरिकांच्या अडचणींचे निरसन व्हावे, यासाठीची सुयोग्य यंत्रणा आणि कार्यपद्धती यांस अनुसरून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे कार्यालय काम करीत आहे. सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा होऊन काम करणारे अर्थात मंत्री कार्यालय सलग दुसऱ्यांदा आयएसओ प्रमाणपत्राचे मानकरी ठरले आहे. ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आयएसओचे अधिकारी व्ही. बालकृष्णन यांच्या हस्ते मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

गेल्या पाच वर्षांत मंत्री म्हणून श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला मिळालेला हा दुसरा बहुमान आहे. मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावे, त्यांना विनाकारण ये-जा करावी लागू नये, यासाठी त्यांच्या तक्रारींची, निवेदनाची दखल घेत त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरावा करण्याची कार्यपद्धती या कार्यालयात अवलंबली जात आहे. मंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी ते अगदी लिपिकापर्यंत कामाची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत असल्याबाबत स्वत: मंत्री श्री. मुनगंटीवार सातत्याने आग्रही असतात आणि त्यासंदर्भात पाठपुरावाही करतात. त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल आयएसओ प्रमाणपत्राद्वारे सलग दुसऱ्यांदा घेण्यात आली आहे.

या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सुपारीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा लावला छडा, पाच जणांना अटक
Spread the love

One Comment on “सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयास सलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *