Online monitoring should be done through CCTV in all hospitals in the state
राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाईन देखरेख करावी
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाला भेट
ठाणे : वाहतूक पोलीस ज्याप्रमाणे सिग्नलवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करत असतात. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच रुग्णालयाच्या आतमधील परिस्थितीचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात यावी. यातून रुग्णांची परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी त्या ठिकाणी रुग्ण कोणत्या अवस्थेत होता. त्याची काय परिस्थिती होती. हे समजण्यास मदत होईल. तसेच त्याला तात्काळ मदत पोहोचवता येईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील रुग्णालयात रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. त्यासंदर्भातील उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक घेतली.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कळवा रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे, परंतु कोविड काळात आणि कोविड नंतर बऱ्याचशा अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येते याची वस्तुस्थिती काय आहे आणि हे का घडलं याच्या खोलामध्ये जाण्यासाठी राज्य सरकारने शोधन समिती नेमलेली आहे.
मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिलेल आहे, येथील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी निधी आणि मनुष्यबळासाठी कशी चालना देता येईल यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती या नात्याने आणि ठाणेकरांना कशी मदत करता येईल यासाठी आज येथे आले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
ज्या दिवशी घटना घडली त्यासंदर्भात नागरिकांना काही माहिती काळवायची असेल तर त्यांनी पुढे यावे. यासाठी स्थानिक प्रशासनाने त्यांना त्याबाबत संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून नागरिक प्रशासनासोबत थेट संपर्क साधतील. संपर्क करणाऱ्या नागरिकांची नावे गोपनीय ठेवली जावीत.असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवता येईल. असे डॉक्टर गोऱ्हे यांनी नमूद केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने रुग्णालयात आग प्रतिबंधक वस्तूंचा वापर होणे आवश्यक आहे. रुग्णालयात असणाऱ्या इलेक्ट्रिकल्स वस्तूंची वेळोवेळी तपासणी व्हावी असे. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
राज्य सरकारने सर्व रुग्णालयाला जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात हीच माझी सरकारकडून अपेक्षा असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या बैठकीला, ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर, शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. नरेश म्हस्के, कळवा हॉस्पिटल अधीक्षक डॉ. अनिरुद्ध म्हाळगावकर, सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार, ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बर्गे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद ठाणे डॉ. रुपाली सातपुते आदी उपस्थित होते.
यादरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा उपसभापती यांच्या समोर सादर केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राज्यातील सर्वच रुग्णालयातील सीसीटीव्हीद्वारे ऑनलाईन देखरेख करावी”