Online training of UPSC Civil Service Personality Test Examination through BARTI

Online training of UPSC Civil Service Personality Test Examination through BARTI.

 Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) Pune, has given the benefit of financial assistance scheme for Personality Test Examination-2020,  for 22 candidates who have passed UPSC Civil Service Main Examination-2020.

  In order to recruit more and more candidates for the post of Central Chartered Officer in the State of Maharashtra, Barti plans to provide pre-interview training along with financial assistance to the candidates. Accordingly, as per the instructions given by the Government of Maharashtra during the Covid-19 epidemic, 22 eligible candidates of Scheduled Castes are being imparted online training for the UPSC Civil Service Personality Test from May 10, 2021. Dhammajyoti Gajbhiye, Director General, Babasaheb Ambedkar Research and Training Institute, Barti, informed in a press release.

 Social Welfare Commissioner, Dr. The preparatory training was inaugurated with an online guidance lecture by Prashant Naranware. The training will be imparted till June 13, 2021, in which the senior central chartered officers will guide the candidates. Two mock interviews of the candidates will be conducted during the training. This has also been reported.

बार्टी मार्फत,  यु.पी.एस.सी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण. 

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) पुणे  मार्फत, यु.पी.एस.सी नागरी सेवा मुख्य परीक्षा -2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 22 उमेदवारांना,  व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करीता आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ दिला आहे. 

महाराष्ट्र राज्यातील अधिकाधिक उमेदवारांची केंद्रीय सनदी अधिकारी पदी नेमणूक होण्या करीता उमेदवारांना अर्थसहाय्य योजने बरोबर  मुलाखतीची पूर्वतयारी प्रशिक्षण देण्याची योजना बार्टी संस्थेने आखली आहे. त्यानुषंगाने कोविड-19 या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या 22 पात्र उमेदवारांना 10 मे 2021 पासून यु.पी.एस.सी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

समाज कल्याण,आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानातून सदर पूर्वतयारी प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रशिक्षण 13 जून 2021 पर्यंत देण्यात येणार असून यामध्ये वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकारी या उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान  उमेदवारांचे दोन मॉक इंटरव्ह्यू घेण्यात येतील. असेही पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *