पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

Traffic signal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Provisional orders issued regarding changes in parking and traffic arrangements

पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

जहांगीर चौक ते मगरपट्टा रस्त्यावरील रेल्वे फ्लायओव्हरपर्यंत पूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूकडून सर्व प्रकारच्या जड वाहनास प्रवेश बंदी

पुणे : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील वानवडी, मुंढवा, हडपसर, येरवडा, भारती विद्यापीठ, डेक्कन वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.

Traffic signal हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image by Wikimedia Commons
https://commons.wikimedia.org/

वानवडी वाहतूक विभागाअंतर्गत जांभुळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे (दिव्यानगर) जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस (सुमारे २०० मीटर) पार्किंग व रस्त्याच्या उजव्या बाजूस (सुमारे २०० मीटर) नो-पार्किंग करण्यात येत आहे.

मुंढवा, हडपसर वाहतूक विभागाअंतर्गत जहांगीर चौक ते मगरपट्टा रस्त्यावरील रेल्वे फ्लायओव्हरपर्यंत पूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूकडून सर्व प्रकारच्या जड वाहनास प्रवेश बंदी करण्यात येत आहे. जहांगीर चौक-ताडीगुत्ता चौक-मुंढवा रस्त्याने मुंढवा जंक्शन व पुढे इच्छित स्थळी या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.

येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत गुंजन चौकाकडून गोल्फ क्लब चौकाकडे जाताना गोल्फ ओव्हर ब्रिजच्या सुरूवातीपासून (बाफना हार्डवेअर शॉप) ते गोल्फ क्लब चौकापर्यंत डाव्या बाजूस २०० मीटर नो पार्किंग करण्यात येत असून गोल्फ क्लब चौकाकडून गुंजनकडे जाताना गोल्फ क्लब चौक ते गोल्फ ओव्हर ब्रिजच्या शेवटी (येवले चहा शॉप) पर्यंत डाव्या बाजूस २०० मीटर नो पार्किंग करण्यात येत आहे.

भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ४८ वर स्वामीनारायण ओव्हर ब्रिज ते दरी पुलाकडे जाणाऱ्या पूर्वेकडील सेवारस्त्यावर दोन्ही बाजूस ४०० मीटरपर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे. हेमी पार्क ए,बी,सी,डी सहकारी गृहरचना संस्था मर्या. सोसायटी समोरील रस्त्यावर पूर्वेच्या बाजूस १०० मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.

डेक्कन वाहतूक विभागांतर्गत कमला नेहरू पार्क ते पीवायसी हिंदु जिमखाना रस्त्यावरील पवार बंगला ते आनंद भवन दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग तर दक्षिणेस असलेल्या संजिवन बंगला ते निर्मल बंगला व उत्तरेस असलेल्या दाणी बंगला ते दातार नेत्र क्लिनीक या दरम्यान पी-१, पी-२ पार्किंग करण्यात येत आहे.

वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात १९ नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील.

मुंढवा वाहतूक विभागांतर्गत ताडीगुत्ता चौकात हडपसर रेल्वे स्टेशन बाजूकडून येणाऱ्या वाहनांना हॉटेल बॉटल फॉरेस्ट ते ताडीगुत्ता चौक अशी नो एन्ट्री करण्यात येत असून ताडीगुत्ता चौकातून हडपसर रेल्वे स्टेशनकडे वाहन जाण्यास परवानगी आहे.

हॉटेल बॉटल फॉरेस्टच्या पूर्व बाजूने किंवा हॉटेल मसालेदार समोरून घोरपडी रस्त्यावर येवून डावीकडे वळून सरळ ताडीगुत्ता चौकातून इच्छितस्थळी या पर्यायी मार्गाने जाता येईल. या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने सूचना व हरकती २० नोव्हेंबरपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात, असे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल
Spread the love

One Comment on “पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *