The number of people who have overcome corona in the country is over 4 crores
देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर.
देशातली 34 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट.![The number of people who have overcome corona in the country is over 4 crores](data:image/svg+xml,%3Csvg%20xmlns='http://www.w3.org/2000/svg'%20viewBox='0%200%20283%20178'%3E%3C/svg%3E)
नवी दिल्ली: देशातल्या 34 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कोरोना संक्रमण आणि बाधितांच्या दरात घट होत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली.16 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत कोविड 19 लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांचं प्रमाण 100 टक्के असून 4 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ते 96 ते 99 टक्क्यांच्या दरम्यान असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितल.
मात्र केरळ आणि मिझोराम मध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
कोविड 19 च्या नवीन प्रकारात फार गुंतागुंत नसल्यानं आणि मृत्यूची शक्याता अगदी कमी असल्यामुळे सध्याच्या प्रकारात शस्त्रक्रिया सुरक्षित असल्याचंहि आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. 268 जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर 5 टक्यांपेक्षा कमी आहे. 11 जिल्ह्यांमधल्या शाळा पूर्णपणे उघडल्या असून शाळांमधल्या 95 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.सुधारित मार्गदर्शक नियमांचं पालन करून विद्यार्थ्यानी उपस्थित राहण्यासंदर्भात पालकांची संमती घेणं आवश्यक आहे किंवा नाही हा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यायचा आहे.
देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर.
देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर गेली आहे. काल १ लाख ४९ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, १ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात १४ लाख ३५ हजार ५६९ एक्टीव्ह रुग्ण आहेत. देशातला सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १३ पूर्णांक ३ शतांश टक्के आहे.