PM Modi chairs high-level meeting to review India’s security preparedness in the context of conflict in Ukraine
जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि विद्यमान जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ
समितीची बैठक झाली.
सीमावर्ती भागात तसेच सागरी आणि हवाई क्षेत्रात भारताच्या सुरक्षा सज्जतेसंदर्भातील ताज्या घडामोदींसंदर्भात आणि विविध पैलूंबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
युक्रेनमधून भारतीय नागरिकांसह भारताच्या शेजारील देशांतील काही नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन गंगाच्या तपशीलांसह, युक्रेनमधील ताज्या घडामोडींचीही माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.
खारकीव्ह येथे मृत्यू झालेल्या नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत दिले.