PM Modi speaks to Ukrainian President; Raises safety issue of Indians in the war-hit country
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांसोबत दूरध्वनीवरून चर्चा
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली.
या संभाषणादरम्यान, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली.
सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
हिंसाचार तात्काळ थांबवण्याच्या आणि संवादाकडे परतण्याच्या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार प्रधानमंत्र्यांनी केला. तसंच शांतता प्रयत्नांसाठी कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची भारताची इच्छा व्यक्त केली.
युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रधानमंत्र्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. भारतीय नागरिकांना त्वरीत आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या अधिकार्यांकडून व्यवस्थेची मागणीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.