सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

Maharashtra-Police. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Written Exam on 23rd July for Armed Police Constable Recruitment

सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी, ता. श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथे होणार

पुणे : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ दौंड यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) या रिक्त असलेल्या ११० पदांची लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी परिक्रमा शैक्षणिक संकुल काष्टी, ता. श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथे होणार आहे.

Maharashtra-Police. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News
Image Source
en.wikipedia.org

पोलीस शिपाई (पुरुष) यांची रिक्त असलेल्या ११० पदाकरीता मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांच्या व सामाजिक तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे लेखी परीक्षाकरीता पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जे उमेदवार लेखी परीक्षेकरीता पात्र झालेले आहेत अशा मेदवारांचे लेखी परीक्षा प्रवेश पत्र https://policerecruitment2022.mahait.orgwww.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनेप्रमाणे लेखी परीक्षेकरीता हजर रहावे, असेही राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ च्या समादेशक राजलक्ष्मी शिवणकर यांनी कळविले आहे

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील सर्व गृहनिर्माण संस्थेत विशेष मतदार नोंदणी अभियान
Spread the love

One Comment on “सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *