भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी

Bhor-Velha Sub Division Police Patil Recruitment Exam on 8th October

भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी

पुणे : भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या कालावधीत राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भोलावडे (ता. भोर) येथे आयोजन करण्यात आले आहे.

भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी ३ जुलै २०२३ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येऊन ४ ते १८ जुलै २०२३ या कालावधीत रिक्त पदांसाठी अर्ज मागविणेत आले होते. प्राप्त अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली होती. परंतु, या उपविभागातील पावसाची स्थिती लक्षात घेता सदर लेखी परीक्षेस जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली होती. आता याबाबत पुन:श्च कालबद्ध वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नव्या वेळापत्रकानुसार पात्र उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत टपालाद्वारे ओळखपत्र/ प्रवेशपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशपत्र टपालाने प्राप्त न झाल्यास ६ ऑक्टोबर रोजी भोर उपविभागीय अधिकारी कार्यालयातून प्राप्त होतील. लेखी परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे होणार आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

कागदपत्रांची पडताळणी व तोंडी मुलाखत १२ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस धरुन) सकाळी १०:३० पासून घेण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी १८ ऑक्टोबर रोजी सायं ६ वा. नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी सुधारित कालबद्ध कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
Spread the love

One Comment on “भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *