‘पोलो’ जनसामान्यांचा खेळ व्हावा – राज्यपाल रमेश बैस

The winning team, Dynamics Achievers, was awarded the Aditya Birla Smriti Polo Cup by the Governor. राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक्स अचिव्हर्स या विजेत्या संघाला आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप देण्यात आला. हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

‘Polo’ should be a game of the masses – Governor Ramesh Bais

‘पोलो’ जनसामान्यांचा खेळ व्हावा – राज्यपाल रमेश बैसThe winning team, Dynamics Achievers, was awarded the Aditya Birla Smriti Polo Cup by the Governor.
राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक्स अचिव्हर्स या विजेत्या संघाला आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप देण्यात आला.
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

मुंबई : पोलो खेळाची सुरुवात भारतात झाली असे मानतात. आज हा खेळ जागतिक झाला आहे. साहस, धैर्य, गती व कौशल्य यांचा या खेळात मिलाप आहे. परंतु ऐतिहासिक कारणांमुळे या खेळाकडे राजा महाराजांचा खेळ म्हणून पहिले जाते. ही धारणा बदलून हा खेळ जनसामान्यांचा झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

आदित्य बिर्ला समूहातर्फे आयोजित आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप अंतिम स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आज राज्यपाल बैस यांच्या हस्ते महालक्ष्मी रेसकोर्स येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक्स अचिव्हर्स या विजेत्या संघाला आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप देण्यात आला.

पोलो व हॉर्स रेसिंग हे खेळ महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणू शकतात. या खेळाच्या माध्यमातून रोजगाराच्या देखील अनेक संधी निर्माण होऊ शकतात. उद्योगपती दिवंगत आदित्य बिर्ला यांच्या स्मृती प्रित्यर्थ पोलो कप सुरु केल्याबद्दल समूहाचे अभिनंदन करताना आगामी काळात ही स्पर्धा भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

सुरुवातीला राज्यपालांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील अंतिम सामना डायनॅमिक्स अचिव्हर्स व मुंबई पोलो या संघांमध्ये खेळण्यात आला. डायनॅमिक्स अचिव्हर्स संघाने ७ -६ अंकांनी हा सामना जिंकला.

सामन्यानंतर राज्यपालांच्या हस्ते दोन्ही संघांमधील खेळाडूंचा तसेच पंचांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आदित्य बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, समूहाच्या व्यवसाय आढावा परिषदेचे अध्यक्ष ए के अगरवाला, अमेच्युअर रायडर्स क्लबचे अध्यक्ष श्याम मेहता, उपाध्यक्ष नासिर जमाल, माजी अध्यक्ष सुरेश तापुरीया आदी उपस्थित होते.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव वाटप
Spread the love

One Comment on “‘पोलो’ जनसामान्यांचा खेळ व्हावा – राज्यपाल रमेश बैस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *