पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता

Prime Minister released the first installment to one lakh beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Rural) under PM-Janman पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

Prime Minister released the first installment to one lakh beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Rural) under PM-Janman

पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता

“आदिवासी समुदायाच्या प्रत्येक सदस्याला सरकारी योजनांचे लाभ मिळवून देणे हे पीएम-जनमन महा अभियानाचे उद्दिष्ट आहे”Prime Minister released the first installment to one lakh beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana (Rural) under PM-Janman
पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News, Hadapsar Latest News

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN)अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण) (PMAY – G)च्या एक लाख लाभार्थ्यांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिला हप्ता जारी केला. यावेळी पंतप्रधानांनी पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील मनकुंवारी बाई या आपल्या पतीसोबत शेतकाम करणाऱ्या  महिलेने पंतप्रधानांना सांगितले की ती बचत गटांमध्ये सहभागी होऊन डोना पट्टल तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहे आणि त्याचवेळी पीएम-जनमन संबंधित जनमन संगी यांसारख्या योजनांबाबत घरोघरी जाऊन प्रचाराच्या माध्यमातून जनजागृती देखील करत आहे. दीप समूह नावाच्या 12 सदस्यांच्या बचत गटाची ती सदस्य आहे. वन धन केंद्रांमध्ये बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करण्याचा तिचा विचार असल्याची माहिती देखील मनकुंवारी बाईने  पंतप्रधानांना दिली.तिने पुढे बोलताना तिला मिळालेल्या लाभांविषयी सांगितले आणि पक्के घर, पाणी, गॅस आणि वीज जोडणी आणि आयुष्मान कार्डचा उल्लेख केला ज्यामधून तिच्या पतीला कानाच्या आजारासाठी आणि मुलीसाठी 30 हजार रुपयांचे उपचार मोफत मिळाल्याची माहिती दिली.

मध्य प्रदेशाताली शिवपुरी येथील सहारिया आदिवासी समुदायामधील ललिता आदिवासी ही तीन अपत्यांची माता असलेली महिला आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, पीएम किसान निधी या योजनांची लाभार्थी आहे. तिची मुलगी सहाव्या इयत्तेत आहे आणि तिला लाडली लक्ष्मी योजनेसोबत शिष्यवृत्ती, गणवेश आणि पुस्तके मिळत आहेत. तिचा मुलगा दुसऱ्या इयत्तेत शिकत आहे आणि त्यालादेखील शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा मिळत आहेत. तिचा सर्वात लहान मुलगा अंगणवाडीत आहे. शीतला मैया स्वयम सहायता समूह या महिला बचत गटाची ती सदस्य आहे. तिला कस्टम हायरिंग सेंटरकडून पाठबळ दिले जात आहे. पक्क्या घराचा पहिला हप्ता मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी तिचे अभिनंदन केले.

मूळची नाशिकची असलेली भारती नारायण रन ही महाराष्ट्रातील पिंपरी येथील एकलव्य आदर्श निवासी  शाळेतील इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी असून  तिच्या हिंदी भाषेच्या कौशल्याने तिने पंतप्रधानांना प्रभावित केले. तिच्या शाळेतील सोईसुविधांबद्दल पंतप्रधानांनी चौकशी केली असता तिने शाळेतील मोठे क्रीडांगण,  निवासी वसतिगृह आणि स्वच्छ आहाराची माहिती दिली. भारती हिला मोठेपणी सनदी अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा असल्याचे आणि याची प्रेरणा तिला आश्रमशाळेत शिक्षक असलेल्या तिच्या भावाकडून मिळाल्याचे तिने सांगितले. भारतीचा भाऊ, पांडुरंग यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत एकलव्य आदर्श  शाळेत  शिक्षण घेतले आणि नाशिकमधून पदवी प्राप्त केली. तसेच इतर मुलांना देखील एकलव्य आदर्श  शाळेत शिक्षण घेण्यासाठी आपण प्रेरणा देत असून विशेषकरून ज्या विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होण्याची इच्छा आहे, त्यांना आपण याबद्दल सांगत असल्याचे पांडुरंग यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याच्या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या भागात या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाप्रती असलेल्या त्यांच्या पालकांच्या वचनबद्धतेसमोर ते नतमस्तक झाले. भारती आपले स्वप्न नक्कीच पूर्ण करेल  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच देशात ठिकठिकाणी एकलव्य  शाळांचा विस्तार करण्यासाठी केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.  यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना  एकलव्य शाळेचा भाग होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मोदी की गॅरंटी ’ वाहनांसह विकसित भारत संकल्प यात्रा देशातील प्रत्येक गावात पोहोचत असल्याकडे लक्ष वेधत   विविध सरकारी योजनांशी लोकांना जोडण्यासाठी हे वाहन पोहोचत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  आदिवासी समाजातील घटकांना आकांक्षी  जिल्हा कार्यक्रमाचा   सर्वाधिक फायदा झाला आहे, असे पंतप्रधांनी या कार्यक्रमा संदर्भात बोलताना सांगितले. पंतप्रधांनी  वीज जोडणी , एक राष्ट्र एक शिधापत्रिका  आणि आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी सिकलसेल अॅनिमियाच्या धोक्यांबद्दल बोलत  आदिवासी समाजाच्या अनेक पिढ्या या आजाराने ग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवले.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी  सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. “विकसित  भारत संकल्प यात्रेदरम्यान सिकलसेलचीही तपासणी केली जात आहे. गेल्या 2 महिन्यांत 40 लाखांहून अधिक लोकांची सिकलसेल चाचणी करण्यात आली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारने अनुसूचित जमातींशी संबंधित योजनांच्या तरतुदींमध्ये  5 पटीने वाढ केल्याची माहिती मोदी यांनी  दिली.आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी पूर्वी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या एकूण आर्थिक तरतुदीमध्ये  आता अडीच पटीने वाढ करण्यात आली आहे.10 वर्षांपूर्वीपर्यंत देशात आदिवासी मुलांसाठी केवळ 90 एकलव्य आदर्श शाळा  बांधण्यात आल्याचे  निदर्शनास आणून देत  सध्याच्या सरकारने गेल्या 10 वर्षांत 500 हून अधिक नवीन एकलव्य आदर्श  शाळा बांधण्याचे काम सुरू केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थी   उच्च शिक्षण घेऊन मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.“त्यासाठी आदिवासी भागातील वर्गांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि उच्च शिक्षणाची केंद्रे वाढवली जात आहेत”, असेही ते म्हणाले.

2014 पूर्वी, केवळ 10 वन उत्पादनांसाठी हमीभाव  निश्चित करण्यात आला होता, तर सध्याच्या सरकारने सुमारे 90 वन उत्पादनांना हमीभावाच्या कक्षेत आणले आहे,  “वन उत्पादनांना अधिक भाव मिळावा म्हणून आम्ही वन धन योजना तयार केली”, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  लाखो लाभार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा समावेश असल्याचे  मोदी यांनी सांगितले. “गेल्या 10 वर्षात आदिवासी कुटुंबांना 23 लाख पट्टे   देण्यात आले  आहेत. आम्ही आदिवासी समाजाच्या हाट बाजारलाही प्रोत्साहन देत आहोत.आपल्या आदिवासी बांधवांना आपला  माल देशातील इतर बाजारपेठेत विकता यावा, यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत,” असे त्यांनी सांगितले.

“माझे आदिवासी बंधू आणि भगिनी दुर्गम भागात राहतात पण त्यांच्याकडे विलक्षण  दूरदृष्टी आहे. आमचे  सरकार आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या सन्मानासाठी कशाप्रकारे  काम करत आहे हे आज आदिवासी समाज बघत असून त्यांना हे  समजत आहे, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी  गौरव दिवस म्हणून साजरी करण्याच्या सरकारच्या घोषणेचा आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या देशभरातील 10 मोठ्या संग्रहालयांच्या विकासाचा त्यांनी उल्लेख केला.  आदिवासी समाजाच्या  सन्मानासाठी आणि त्यांना सोईसुविधा पुरवण्यासाठी निरंतर काम करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
राज्यपालांच्या उपस्थितीत ‘मुंबई शाश्वत विकास’ परिषदेचे उद्घाटन
Spread the love

One Comment on “पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *