An appeal to beware of fraudulent websites of Pradhan Mantri Kusum-B Yojana
प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन
पुणे : शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे फसवे संकेतस्थळ आणि लघुसंदेश (एसएमएस)पासून सावध रहावे आणि अशा संकेतस्थळावर कोणतेही पैसे भरू नयेत, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले आहे.
महाऊर्जामार्फत पीएम-कुसुम घटक-ब योजना राबविण्यात येत असून यामध्ये शेतकऱ्यांना 3, 5 व 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप देण्यात येतात. याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 90 टक्के आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 95 टक्के अनुदान दिले जाते.
सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो.
महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएसद्वारे चुकीची लिंक पाठविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी शेतकऱ्यांनी अशा खोट्या किंवा फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैशाचा भरणा करू नये. योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या www.mahaurja.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 020-35000450 वर संपर्क साधावा, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक ए.व्ही.कुलकर्णी यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन”