Organized Pradhan Mantri Vishwakam Kaushal Samman Yojana Workshop on March 10 at Wanwadi
वानवडी येथे १० मार्च रोजी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या कार्यशाळेचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा ग्रामोद्योग सहकारी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, वानवडी येथे १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची कार्यशाळा व जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाने दिली आहे.
केंद्र शासनाने हस्त कौशल्य, अवजारे व साधनांचा उपयोग करुन उत्पादन व सेवा देणाऱ्या बलुतेदार, हस्तकला कारांगीराना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातुन प्रधानमंत्री विश्वकमां कौशल्य सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून राज्यातील अनेक कारागिरांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे. त्या प्रमाणात पुणे जिल्ह्याची नोंदणी अत्यल्प असून नोंदणी वाढवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त कारागिरांनी उपस्थीत राहून नाव नोंदणी करावी. आपला लाभ निश्चित करावा, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामोद्योग सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष शिवाजीराव आदमाने यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम
One Comment on “वानवडी येथे १० मार्च रोजी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या कार्यशाळेचे आयोजन”