Pravin Darekar Distributes Free Cold Boxes To Fish Vendors At Mahul In Mumbai
मुंबईतील माहुल इथल्या मच्छी विक्रेत्यांना प्रविण दरेकर यांनी केले मोफत शीतपेटीचे वितरण
मुंबई: मुंबईतील माहुल इथं मच्छी विक्रेते कोळी बांधवांना आज भाजपच्या मच्छीमार सेलद्वारे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मोफत शीतपेटीचे वितरण केले.
‘कोळी समाज हा मुंबईचा मूळ मालक आहे. मुंबईचा विकास होत असताना दुर्दैवाने कोळी समाज आजही उपेक्षित राहिला असून त्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. त्या प्रश्नांना विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन दरेकर यांनी यावेळी दिले.
भाजपने कोळी समाजाला नेहमीच विधीमंडळात प्रतिनिधीत्व दिले. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मच्छिमार समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. भविष्यातही कोळी बांधवाच्या विकासासाठी भाजपा कटीबध्द आहे असे ही दरेकर यावेळी म्हणाले.