उत्सवांमधल्या खरेदीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देत राहण्याचं आवाहन

Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Prime Minister’s Man Ki Baat appeal to give priority to local products in shopping during upcoming festivals

आगामी सण उत्सवांमधल्या खरेदीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देत राहण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन

नवी दिल्ली : आत्मनिर्भर आणि स्वावलंबी भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आगामी सण उत्सवांमधल्या खरेदीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देत राहूया असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला.हा या कार्यक्रमाचा एकशे सहावा भाग होता.

Infrastructural projects inaugurated in Mumbai will make life of citizens more bearable - Prime Minister मुंबईत उद्घाटन झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळं नागरिकांचं जीवन सुसह्य होईल - प्रधानमंत्री हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
File Photo

यंदाची दिवाळी आपण भारतीयांनीच बनवलेल्या उत्पादनांनी साजरी केली तर कारागिरांच्या आयुष्यात नवी पहाट उगवेल असं ते म्हणाले.गेल्या दहा वर्षांमध्ये खादी उत्पादनांची विक्री ३० हजार कोटी रुपयांवरून सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांवर पोहोचली,यातून शहरं आणि खेड्यापाड्यांमधल्या कारागिरांसह सर्वच घटकांना लाभ झाला.ही वोकल फॉर लोकल या मोहिमेची ताकद आहे,स्थानिक उत्पादनांना प्राधान्य दिल्यानं मेक इन इंडियालाही चालना मिळते असं त्यांनी सांगितलं.

आपल्या देशात, आता, सर्व काही उपलब्ध आहे. हा दृष्टीकोन फक्त लहान दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित नाही. आज भारत जगातलं सर्वात मोठं भव्य उत्पादन केंद्र बनत आहे. अनेक मोठमोठे ब्रँड, नामांकित उत्पादक, त्यांची उत्पादनं इथे तयार करत आहेत. जर आपण ती उत्पादनं स्वीकारली, तर मेक इन इंडियाला चालना मिळते, आणि हा सुद्धा एक प्रकारे लोकल साठी व्होकलच, स्थानिक उत्पादनांसाठीचा आग्रहच असतो.आणि हो, अशी उत्पादनं खरेदी करताना, UPI डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे व्यवहार करण्याचा आग्रह करा… आपल्या जीवनात ही सवय लावून घ्या आणि त्या उत्पादनासह किंवा त्या कारागिरासह आपलं सेल्फी छायाचित्र, नमो अॅप वर टाकून माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ते सुद्धा भारतातच बनवलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून! मी यापैकी काही छायाचित्रं, काही टिप्पण्या समाजमाध्यमांवर टाकेन, जेणेकरून इतर लोकांनाही ‘व्होकल फॉर लोकल’साठी प्रेरणा मिळेल.

नागरिकांना आगामी सणांच्या शुभेच्छा देतानाच, दिवाळीचा सण सुरक्षितपणे साजरा करायचं आवाहनही त्यांनी केलं.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या ३१ ऑक्टोबरला नवी दिल्लीत विशेष कार्यक्रमानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होईल,यावेळी अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून देशभरातून गोळा केलेल्या पवित्र मातीतून अमृत वाटिका उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राबवलेल्या उपक्रमांतून नागरिकांनी आपल्या स्थानिक इतिहासाला नवी ओळख मिळवून दिली,या महोत्सवाला आपण सगळ्यांनी जगातल्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या महोत्सवापैकी एक बनवलं,या महोत्सवातून सामुदायिक सेवेचं अनोखं उदाहरण पाहायला मिळालं असं ते म्हणाले.

३१ ऑक्टोबरलाच मेरा युवा भारत या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.या संघटनेच्या माध्यमातून देशातल्या युवा वर्गाला राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रीय भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे,त्यासाठी या संघटनेच्या माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी या त्यांच्या स्मारकस्थळी मुख्य कार्यक्रम होणार असून नागरिकांनी स्थानिक पातळीवर एकता दौडचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं.

चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांचं शतक पार करणाऱ्या भारतीय खेळाडूंचंही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये कौतुक आणि अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी काही खेळाडूंचा संघर्षमय प्रवास श्रोत्यांसमोर मांडला.हे खेळाडू जेव्हा मायदेशी परततील तेव्हा आपल्या आसपासच्या अशा खेळाडूंची आपण सहकुटुंब भेट घेऊन त्यांचं अभिनंदन करावं असं आवाहन त्यांनी केलं.

३१ ऑक्टोबरलाच असलेल्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त प्रधानंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यासोबतच गोविंदगुरु यांची पुण्यतिथीनिमीत्तही त्यांनी श्रद्धांजली वाहिली.तसंच भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना आदरांजली वाहिली.संत मीराबाई यांच्या पाचशे पंचवीसाच्या जयंतीनिमीत्त प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्मरण केलं.अन्यायकारक रुढी परंपरांविरोधात उभ्या ठाकलेल्या संत मीराबाई आजही देशातील माता,भगिनी आणि मुलींसाठी प्रेरणास्रोत आहेत,त्यांच्या चरित्रातून साधेपणातलं सामर्थ्य दिसून येतं असं ते म्हणाले.यावेळी प्रधानमंत्र्यांनी आदिवासी समाजासाठी झटलेल्या शूरवीरांचंही त्यांनी स्मरण केलं.

साहित्याच्या माध्यमातून आपली स्थानिक परंपरा आणि संस्कृतीच्या जतन,संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी काम करत असलेल्या काही व्यक्तींची,तसंच वेस्ट टू वेल्थ संकल्पनेअंतर्गत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्यांची काही प्रेरणादायी उदाहरणंही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून श्रोत्यांसमोर मांडली.येत्या १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यता येणार असल्याचं सांगून ते म्हणाले की आजही आदिवासींचा जीवनविषयक दृष्टिकोन निसर्गाशी मैत्रीचा असतो.एक भारत श्रेष्ठ भारत विषयी त्यांनी आज तमिळनाडूतल्या साहित्यिकांचा उल्लेख केला.ज्येष्ठ लेखिका शिव शंकरी आणि कथाकथनकार थिरु ए.के.पेरुमल यांच्या कार्यची त्यांनी ओळख करुन दिली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोलबॉल चा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *